Nora Fatehi: नोरा फतेहीचा फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स; पाहा VIDEO

Nora Fatehi FIFA World Cup 2026 performance: अभिनेत्री आणि गायिका नोरा फतेहीने फिफा विश्वचषक 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या दमदार नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
Nora Fatehi FIFA World Cup 2026 performance
Nora Fatehi FIFA World Cup 2026 performancefile photo
Published on
Updated on

Nora Fatehi FIFA World Cup 2026 performance

टोरांटो: अभिनेत्री आणि गायिका नोरा फतेहीने फिफा विश्वचषक 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या दमदार नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. कॅनडा आणि बोस्निया यांच्यातील सामन्यापूर्वी शुक्रवारी टोरांटो स्टेडियममध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात नोराने अधिकृत फिफा गाण्यावर सादरीकरण करत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

उद्घाटन सोहळ्यात अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अ‍ॅलनिस मॉरिसेट, अ‍ॅलेसिया कारा, मायकेल बुब्ले, एलियाना, जेसी रेयेज, संजॉय, वेजीड्रीम आणि विल्यम प्रिन्स यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात कॅनडाच्या आदिवासी संस्कृती आणि वारशाला मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी फुटबॉल मैदान लाल, पांढऱ्या आणि सोनेरी रंगांनी उजळून निघाले होते.

Nora Fatehi FIFA World Cup 2026 performance
FIFA World Cup Gilberto Mora: कोण आहे हा गिलबर्टो मोरा? १७ वर्षीय फुटबॉलपटूने फिफा विश्वचषकात ९६ वर्षांचा विक्रम मोडला!

अ‍ॅलेसिया काराच्या सादरीकरणानंतर नोरा फतेहीने लाल रंगाच्या आकर्षक पोशाखात रंगमंचावर प्रवेश केला. तिने वेजीड्रीम आणि संजॉय यांच्यासोबत फिफाचे अधिकृत गाणे ‘Siir Siir’ सादर केले. तिच्या नृत्याने आणि आकर्षक स्टेज प्रेझेन्सने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला.

मेक्सिकोतील उद्घाटन सोहळ्यात शकीराची जादू

फिफा विश्वचषक 2026 ची अधिकृत सुरुवात गुरुवारी मेक्सिकोमध्ये भव्य उद्घाटन सोहळ्याने झाली. पॉप स्टार शकीरा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. तिने स्पर्धेचे अधिकृत गीत ‘Dai Dai’ सादर केले. यावेळी नायजेरियन संगीत कलाकार बर्ना बॉयही तिच्यासोबत रंगमंचावर उपस्थित होता. मेक्सिकोतील एस्टादिओ अ‍ॅझ्टेका स्टेडियममध्ये शकीराने आपल्या नृत्यशैलीनेही चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले.

Nora Fatehi FIFA World Cup 2026 performance
FIFA World Cup 2026 | सूर... ताल... फुटबॉलचा थरार..! शकिरा-बर्ना बॉयच्या परफॉर्मन्सने स्पर्धेचे ऐतिहासिक उद्‌घाटन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news