कुस्तीमध्ये अजय कापडे, सुमितकुमार भारस्कर यांचे सनसनाटी सुवर्णपदक

कुस्तीमध्ये अजय कापडे, सुमितकुमार भारस्कर यांचे सनसनाटी सुवर्णपदक

Published on

भोपाळ, वृत्तसंस्था : कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात (Khelo India Youth Games) महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे स्वप्न आज अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर या मल्लांनी साकार केले. त्यांनी अनुक्रमे फ्री स्टाईल व ग्रीको रोमन विभागात ही कामगिरी केली.

फ्री स्टाईलमधील 65 किलो वजनी गटात अजय याने पहिल्याच कुस्तीत हरियाणाच्या विकास यादव याचा 16-6 असा धक्कादायक पराभव केला. विशेष म्हणजे 4-6 अशा पिछाडीवरून त्याने सातत्याने वेगवेगळे डावपेच टाकत सलग बारा गुण जिंकले आणि विजयश्री खेचून आणली. या लढतीच्या वेळी हरियाणाच्या पाठीराख्यांकडून पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता. तसेच विकासच्या प्रशिक्षकांनीही मिळवलेल्या गुणांबाबत दोन वेळा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, पंचांनी प्रत्येक वेळी त्यांचे हे आक्षेप खोडून काढले. ही लढत जिंकल्यानंतर अजय याने नंतरच्या फेरीत हरियाणाच्या अतुल कुमार याला 7-2 ने पराभूत केले. (Khelo India Youth Games)

उपांत्य फेरीत त्याने तेलंगणाच्या निखिल कुमार याचा 5-4 असा पराभव केला. अंतिम फेरीत अजयपुढे दिल्लीच्या आकाश कुमार याचे आव्हान होते. पहिल्या दोन मिनिटांच्या फेरीत त्याने 3-1 अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णायक ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news