Yashasvi Jaiswal: यशस्वी भव! कोहली-गिलला जे जमलं नाही, ते यशस्वी जैस्वालने अवघ्या ६ मॅचमध्ये करून दाखवलं! पाहा नवा रेकॉर्ड

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार शतकी खेळी करत भारताला ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswalfile photo
Published on
Updated on

Yashasvi Jaiswal

नवी दिल्ली: चेन्नई येथे पार पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार शतकी खेळी करत भारताला ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयी शतकासह यशस्वीने विराट कोहली आणि शुभमन गिल यांसारख्या दिग्गज भारतीय फलंदाजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अवघ्या ६ डावांमध्ये २ एकदिवसीय शतके ठोकणारा यशस्वी हा भारताचा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या या नाबाद ११० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा ३-० असा सूपडा साफ केला.

विजयासाठी मिळालेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरुवातीपासूनच मजबूत स्थितीत होता. अफगाणिस्तानच्या डावादरम्यान त्यांना ५ धावांचा दंड ठोठावण्यात आल्यामुळे भारताने ५/० अशा धावसंख्येवरून आपल्या डावाची सुरुवात केली. यशस्वीने मैदानात उतरताच आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकले आणि अवघ्या ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्मानेही त्याला उत्तम साथ देत ४७ चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या.

Yashasvi Jaiswal
FIFA World Cup Mystery Girl | कॅमेऱ्यात दिसली आणि झाली व्हायरल; कोण आहे ‘ती’ मिस्ट्री गर्ल’?

सलामीची १७० धावांची भागीदारी

रोहित आणि यशस्वी या जोडीने अवघ्या २२.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी १७० धावांची मजबूत भागीदारी रचली. रोहितने आपल्या नेहमीच्या शैलीत फटके मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तर जैस्वालने संपूर्ण डावात आत्मविश्वासाने फलंदाजी केली. रोहित शर्मा ७९ धावांवर बाद झाला, तरी यशस्वीने एक बाजू लावून धरत ८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही आता यशस्वीने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या यादीतील अव्वल ७ पैकी ३ शतके याच चालू मालिकेत झळकावली गेली आहेत.

अफगाणिस्तानविरुद्ध सर्वात वेगवान एकदिवसीय शतके (चेंडू)

५७ चेंडू - इऑन मॉर्गन (२०१९)

६३ चेंडू - रोहित शर्मा (२०२३)

७१ चेंडू - इशान किशन (२०२६)

७६ चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (२०२३)

७७ चेंडू - शुभमन गिल (२०२६)

८३ चेंडू - विल्यम पोर्टरफिल्ड (२०१७)

८३ चेंडू - यशस्वी जैस्वाल (२०२६)

प्रसिद्ध कृष्णाचा 'पंच' आणि शाहिदीचे झुंजार शतक

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अफगाणिस्तानचा संघ २१८ धावांत सर्वबाद झाला; यात प्रसिद्ध कृष्णाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ५ बळी (२३ धावांत ५ बळी) टिपले. संघाची अवस्था ३६ धावांत ४ बाद अशी बिकट झाली असताना, कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने झुंजार खेळ करत कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक (१०२ धावा) झळकावले. मात्र, यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकामुळे लक्ष्य गाठताना कोणताही अनपेक्षित अडथळा आला नाही; परिणामी भारताने हा सामना अत्यंत सहज खिशात घातला.

Yashasvi Jaiswal
Gambhir vs Sreesanth : "गौतम गंभीरने 'देशद्रोही' म्हटले, शिवीगाळही केली"; 'त्‍या' वादावर श्रीसंतचा धक्कादायक खुलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news