FIFA World Cup Mystery Girl | कॅमेऱ्यात दिसली आणि झाली व्हायरल; कोण आहे ‘ती’ मिस्ट्री गर्ल’?

FIFA World Cup Mystery Girl |
FIFA World Cup Mystery Girl | कॅमेऱ्यात दिसली आणि झाली व्हायरल; कोण आहे ‘ती’ मिस्ट्री गर्ल’?
Published on
Updated on

ग्वादालाहारा : फिफा वर्ल्ड कप २०२६ चा थरार सध्या मैदानात आणि मैदानाबाहेरही पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या या महाकुंभात खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा स्टेडियममधील एका ‘मिस्ट्री गर्ल’ची सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. तिच्या ग्लॅमरस लूक आणि व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ‘सुपरहॉट’ अशी दाद दिली आहे.

ग्वादालाहारा येथील ‘एस्तादियो अक्रॉन’ स्टेडियमवर झालेल्या मेक्सिको आणि दक्षिण कोरिया यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यादरम्यान या तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या तरुणीचे नाव ओलिव्हिया बेथेल असून, इंटरनेट जगतात ती ‘एच टाऊन गर्ल’ या नावाने प्रसिद्ध आहे. ओलिव्हियाने मेक्सिकोच्या विजयानंतर स्टेडियममध्ये केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

हा व्हिडीओ काही तासांतच इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. अमेरिकेतील ह्युस्टन येथे राहणारी ओलिव्हिया ही एक लोकप्रिय ‘डिजिटल कंटेंट क्रिएटर’ आहे. ती मेक्सिको फुटबॉल संघाची कट्टर चाहती असून, संघाला पाठिंबा देण्यासाठी ती प्रत्येक सामन्याला हजेरी लावते. यापूर्वी मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव केला होता, त्या सामन्यानंतरही ओलिव्हियाचा स्टेडियममधील डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news