WTC Final 2025 : सामना ड्रॉ झाल्यास ट्रॉफी कोणाला मिळणार? ICC च्या ‘या’ नियमानुसार दिली जाणार बक्षीस रक्कम

WTC अंतिम 2025 : स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा अंतिम सामना द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 ते 15 तारखेला लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
WTC Final 2025 South Africa vs Australia
Published on
Updated on

wtc final 2025 south africa vs australia if match draw then what happens

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा अंतिम सामना 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. सर्व चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लढतीमध्ये गतविजेत्या संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. आफ्रिकन संघ पहिल्यांदाच डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

दोन्ही संघांकडे उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणे आहेत, जी इंग्लंडच्या परिस्थितीत खूप घातक ठरतील. त्यामुळे सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. तथापि, जर हा महामुकाबला अनिर्णित राहिला तर कोणत्या संघाला ट्रॉफी मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे, जो आयसीसीने आधीच आपल्या नियमांसह स्पष्ट केला आहे.

WTC Final 2025 South Africa vs Australia
IND vs ENG Test Series : टीम इंडियाचे इंग्लंडमध्ये कसोटी रेकॉर्ड कसे आहे? आतापर्यंत कितीवेळा जिंकले? जाणून घ्या आकडेवारी

सामना अनिर्णित राहिला तर...

इंग्लंडमध्ये, खराब हवामानामुळे सामन्यादरम्यान अनेकदा व्यत्यय आला आहे. 11 जूनपासून सुरू होणा-या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबतही अशाच काही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या कारणास्तव, आयसीसीने जेतेपदाच्या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. जर डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर आयसीसी नियम 16.3.3 वापरला जाईल. या नियमानुसार, जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघ विजेते मानले जातील.

WTC Final 2025 South Africa vs Australia
Cummins vs Bumrah WTC : कांगारू कर्णधार बुमराहचा विक्रम मोडण्यापासून 5 विकेट्स दूर, WTCमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या पर्वाचे सर्व सामने संपले तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर होता.

तर बक्षिसाची रक्कम समान विभागली जाईल

जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्यास बक्षिसाची रक्कम देखील समान विभागली जाईल. आयसीसीने आधीच बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. यात विजेत्या संघाला 3.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 30.7 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला 2.16 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 18.53 कोटी रुपये देण्यात येतील.

WTC Final 2025 South Africa vs Australia
IND vs ENG Test Series : ‘सचिन-अँडरसन’... पतौडी ट्रॉफीचे नामांतर : परंपरेचा अंत की नव्या युगाची सुरुवात?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news