

WPL 2026 Final Live Streaming Details: महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना आज गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी Delhi Capitals Women आणि Royal Challengers Bengaluru Women यांच्यात रंगणार आहे. हा सामना वडोदऱ्यातील BCA Stadium Vadodara येथे खेळला जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर बेंगळुरू दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल. आतापर्यंत झालेल्या तीन हंगामांत दोन वेळा मुंबई इंडियन्सने, तर एकदा बेंगळुरूने ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे यंदा नवीन विजेता मिळतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 7 वाजता होणार आहे.
भारतामध्ये हा अंतिम सामना टीव्हीवर Star Sports Network वर थेट पाहता येईल.
मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहण्यासाठी JioHotstar अॅप किंवा वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. जर तुम्ही जिओ सिम वापरत असाल, तर काही निवडक रिचार्ज प्लॅनसोबत JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळतं. अशा वेळी अतिरिक्त पैसे न देता सामना पाहता येतो. इतर प्लॅनमध्ये मात्र स्वतंत्र सबस्क्रिप्शन घ्यावं लागू शकतं.
बेंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वोल, ऋचा घोष, राधा यादव, नदीन डी क्लर्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल, सयाली साठघरे.
दिल्ली: शेफाली वर्मा, लिझेल ली, लॉरा वोलवार्ड, जेमिमा रोड्रिग्झ (कर्णधार), निकी प्रसाद, मॅरिझान कॅप, चिनेल हेन्री, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चरणी, मिन्नू मनी, नंदिनी शर्मा.