

Women WC 2025 final
नवी मुंबई : भारतीय क्रिकेट संघांबरोबर चाहत्यांसाठीही २०२३ हे वर्ष संमिश्र भावना ठरले होते. टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता केवळ एका पावलावर विश्वचषक, असे स्वप्नही क्रिकेटप्रेमींनी पाहिले. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नामुष्कीजनक पराभवाचा सामना कराव लागला. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या विधानाचे स्मरण आता महिला विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने करुन दिले आहे. २०२३ च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासारखे वातावरण पुन्हा तयार करण्याची इच्छा व्यक्त करत भारतीय प्रेक्षकांना शांत करून विजय मिळवण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.
2०२३ च्या अंतिम सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला होता की, "मोठ्या गर्दीला शांत करण्यापेक्षा दुसरे काहीही अधिक समाधानकारक नाही"
"आशा आहे की आम्ही जिंकू. मला वाटते त्यामुळे प्रेक्षक शांत होतील," अशा शब्दांत महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत वोल्वार्ड आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच नवी मुंबईत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळणे आव्हानात्मक असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामनाही मोठ्या धावसंख्येचा (high-scoring) असेल, ज्यात दोन्ही संघांनी मिळून ६७९ धावा केल्या होत्या. दबावाखाली शांत राहणे महत्त्वाचे ठरेल, असे वोल्फार्ड्टने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेने आपल्या विश्वचषक सुरुवातीचा टप्पा अत्यंत सुमार खेळाने केली होती, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ६९ धावांतच (२०.४ षटकांत) संघ गारद झाला होता. मात्र, यानंतर जोरदार पुनरागमन करत प्रथमच महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध कर्णधार वोल्फार्ड्टने १९३ चेंडूत विक्रमी १६९ धावांची खेळी करत संघात अंमित फेरीत पोहचवले आहे. आता तिने भारतीय प्रेक्षकांना शांत करणार असल्याचे आव्हान दिले आहे. पुढील काही तासांमध्येच दक्षिण आफ्रिका संघ हे आव्हान पेलणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.