पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने आज इतिहास घडवला. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात निकोलस पूरन आणि जॉन्सन चार्ल्स यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संघाने विश्वचषक स्पर्धेत पॉवरप्ले (सामन्यातील पहिली ६ षटके) मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. या कामगिरीमुळे वेस्ट इंडिज संघाने नेदरलँडचा 10 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. अफगाणिस्तानचा संघ16.2 षटकामध्ये ११४ धावांवरच गारद झाला. वेस्ट इंडिजने हा सामना तब्बल १०४ धावांनी जिंकला. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजने २१८ धावा करत यंदाच्या T20 विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्याही आपल्या नावावर नोंदवली आहे.
आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस हरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजला दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिला धक्का बसला. अजमतुल्ला उमरझाईने ब्रेंडन किंगला सात धावांवर बाद केले. यानंतर निकोलस पुरन आणि जॉन्सन चार्ल्स यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारली. पहिल्या सहा षटकांत विंडीजने 92 धावा केल्या. T20 विश्वचषकातील ही पॉवरप्लेमधील स्कोअर धावसंख्यला आहे आहे. यापूर्वी हा विक्रम नेदरलँडच्या नावावर होता. 2014 मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध एका विकेटसाठी 91 धावा केल्या होत्या.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडिजने चौथ्या क्रमांकाची पॉवरप्ले धावसंख्या केली. क्रिकेटमधील टी-20 फॉरमॅटमध्ये 100 धावांचा टप्पा पार करणारा दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ आहे. 2023 मध्ये दि. आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सहा षटकात 102 धावा केल्या होत्या.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीज संघाने दमदार कामगिरी करत चालू स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या केली. निकोलस पूरनच्या 98 धावांच्या दमदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. विशेष म्हणजे, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिजची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध 225/7 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतासोबत संयुक्तपणे ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे.