IPL 2026 mystery girl: काश्मिरा परदेशी कोण आहे? पंजाब किंग्सचा स्टार खेळाडू करतोय डेट, व्हिडिओ व्हायरल

Who is Kashmira Pardeshi: इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यादरम्यान एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Kashmira Pardeshi
Kashmira PardeshiKashmira Pardeshi instagram
Published on
Updated on

Nehal Wadhera girlfriend Kashmira Pardeshi IPL 2026

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यादरम्यान एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही 'मिस्ट्री गर्ल' दुसरी कोणी नसून अभिनेत्री काश्मीरा परदेशी असल्याचे समोर आले असून, पंजाब किंग्सचा फलंदाज निहाल वढेरा आणि ती एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

Kashmira Pardeshi
CSK vs PBKS | पंजाबचा स्वप्नवत विजय! बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का

चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात काश्मीरा पंजाब किंग्सला चियर करताना कॅमेऱ्यात कैद झाली. विशेष म्हणजे, ती पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा हिच्यासोबत बसलेली दिसली. संघाने परिधान केलेली जर्सी आणि तिचा उत्साह पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल केले. निहाल वढेरा आणि तिच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

कोण आहे काश्मीरा परदेशी?

अभिनेत्री काश्मीराने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने २०१८ मध्ये 'नर्तनाशाला' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१९ मध्ये तिने 'सिवप्पू मंजल पचाई' या चित्रपटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्याच वर्षी अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटातही ती झळकली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द फ्रीलान्सर' या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

सामन्यादरम्यानच्या तिच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेक चाहत्यांनी तिला 'नॅशनल क्रश' म्हटले आहे, तर काहींनी निहाल वढेरासोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल कुतूहल व्यक्त केले आहे. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. सोशल मीडियावरील ही केवळ अफवा आहे की वास्तव, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Kashmira Pardeshi
GT vs RR | राजस्थान रॉयल्सचा 6 धावांनी थरारक विजय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news