Sanju Samson Love Story: संजू सॅमसनची पत्नी चारुलथा रमेश कोण आहे? फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टपासून सुरू झाली प्रेमकहाणी

Sanju Samson Love Story: भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची पत्नी चारुलथा रमेश ही केरळमधील उद्योजिका आणि एचआर तज्ज्ञ आहे. दोघांची ओळख तिरुवनंतपुरममधील मार इव्हानिओस कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना झाली.
Sanju Samson Love Story
Sanju Samson Love StoryPudhari
Published on
Updated on

Charulatha Remesh Sanju Samson Wife Love Story Marriage: भारतीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेला संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. संजूच्या यशामागे त्याची पत्नी चारुलथा रमेशचा मोठा वाटा आहे.

केरळची सुशिक्षित तरुणी

चारुलथा रमेश या केरळमधील तिरुवनंतपुरमच्या आहेत. त्यांचे वडील बी. रमेश कुमार हे ‘मातृभूमी’चे मुख्य वृत्तसंपादक आहेत, तर आई राजश्री रमेश या एलआयसी इंडियामध्ये कार्यरत आहेत. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या वातावरणात वाढलेल्या चारुलथा यांनी आर्या सेंट्रल स्कूलमधून शिक्षण घेतले.

त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील मार इव्हानिओस कॉलेजमधून रसायनशास्त्र विषयात पदवी मिळवली. पुढे लोयोला कॉलेज ऑफ सोशल सायन्समधून ह्युमन रिसोर्सेसमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. चारुलथा या उद्योजिका आणि एचआर तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात.

फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टपासून सुरू झाली प्रेमकहाणी

संजू आणि चारुलथा यांची ओळख कॉलेजमध्ये झाली. दोघेही मार इव्हानिओस कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. या मैत्रीची सुरुवात एका साध्या फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टने झाली होती. सोशल मीडियावर झालेल्या चॅटींगचे हळूहळू मैत्रीत रुपांतर झाले आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

पाच वर्षांहून अधिक काळ दोघांनी आपलं नातं खासगी ठेवलं होतं. प्रसिद्ध क्रिकेटपटू असूनही संजूने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती कोणाला होऊ दिली नाही. मात्र या काळात त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं.

Sanju Samson Love Story
IND vs ENG Semi Final : टीम इंडियाला फायनलपूर्वीच मोठा धोका..! सेमीफायनल खेळण्याआधीच होणार ‘टाटा बाय बाय..’

२०१८ मध्ये विवाह

२२ डिसेंबर २०१८ रोजी दोघांनी कोवलम, केरळ येथे विवाह केला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. वेगवेगळ्या धर्माची पार्श्वभूमी असूनही (संजू ख्रिश्चन तर चारुलथा हिंदू नायर कुटुंबातील) दोघांनी ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’ अंतर्गत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न समारंभात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन तसेच भारतीय क्रिकेटमधील दिग्गज राहुल द्रविड उपस्थित होते.

Sanju Samson Love Story
SA vs NZ Semi Final : १९ वर्षांचा दुष्काळ, ५ पराभव..! द. आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडची पाटी कोरीच, उपांत्य फेरीत इतिहास बदलणार का?

करिअर आणि कुटुंब

चारुलथा या व्यावसायिक असून त्यांनी स्वतःच्या मेहतीने समाजात स्थान निर्माण केले आहे. त्या अनेकदा संजूसोबत सामन्यांना उपस्थित असतात आणि सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील खास क्षण शेअर करताना दिसतात.

आजही हे दाम्पत्य आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा सुंदर समतोल राखत आहे. दोघेही सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असून चाहत्यांना त्यांच्या नात्यातील साधेपणा आणि परस्पर विश्वासाचे कुतुहल आहे. क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज खेळी करणाऱ्या संजू सॅमसनच्या आयुष्यातील ही प्रेम कहाणी तितकीच खास आणि प्रेरणादायी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news