Washington Sundar IPL 2026: वॉशिंग्टन सुंदरनं तब्बल १० वर्षे पाहिली वाट... अखेर DC विरूद्ध तो सोन्याच्या दिवस उगवलाच

Washington Sundar
Washington Sundar pudhari
Published on
Updated on

Washington Sundar IPL 2026: आयपीएल २०२६ चा १४ वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातनं दिल्लीचा अवघ्या १ धावेने पराभव केला. दरम्यान, या सामन्यात गुजरातच्या वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी केली. भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने आपले पहिले वहिले आयपीएल अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे सुंदर हा गेल्या १० वर्षांपासून आयपीएल खेळतोय मात्र त्याला अर्धशतक ठोकण्यात यश आलेलं नव्हतं. मात्र ६८ सामने आणि ४८ डावात फलंदाजी केल्यानंतर अखेर तो सुवर्ण दिवस आला.

Washington Sundar
IPL 2026 KKR : 6,6,6,6,6... केकेआरमध्ये 'रघु'राज! आयपीएलपूर्वीच शतक ठोकत माहोल केला सेट; मॅनेजमेंटला संदेश थेट

वॉशिंग्ट सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. सुंदरने जॉस बटलरसोबत १०३ धावांची भागीदारी रचली. बटलरने देखील अर्धशतक ठोकलं. या दोन्ही फलंदाजांनी सामन्याचे चित्र पालटले.

हे अर्धशतक सुंदरसाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकते. आयपीएलच्या कारकिर्दीत त्याला फलंदाजीची तशी कमीच संधी मिळाली. मात्र ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

Washington Sundar
IPL Playoff Prediction: IPL 2026 प्लेऑफमध्ये CSK आणि KKR नाही? आकाश चोप्राची धक्कादायक भविष्यवाणी

यापूर्वी सुंदरने आयपीएलमध्ये ४९ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. ही खेळी त्याने गेल्या हंगामात केली होती. वॉशिंग्टन सुंदर २०१७ मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळला होता. मात्र त्याच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी आली नव्हती. सुंदरने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ संघांचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने आतापर्यंत ५८८ धावा केल्या आहेत.

सुंदरचे हे अर्धशतक तीन भागात विभागलं जाऊ शकतं. सुरूवातीला त्याने १२ चेंडूत २९ धावा केल्या. त्यानंतर त्याची खेळी थोडी संथ झाली. त्याने पुढच्या १६ चेंडूत १५ धावा केल्या. मात्र शेवटच्या टप्प्यात त्याने वेगवान फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. गुजरात टायटन्सने ४ बाद २१० धावा केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news