IPL Match Cost: स्टेडियमपासून खेळाडूंपर्यंत... IPL च्या एका सामन्यासाठी किती खर्च येतो? आकडा वाचून धक्का बसेल

IPL Match Cost: IPL चा एक सामना आयोजित करण्यासाठी सुमारे ₹15 कोटी खर्च येतो. स्टेडियम भाडे, खेळाडूंचे मानधन, प्रवास आणि आयोजन खर्च यावर मोठी रक्कम खर्च होते.
IPL Match Cost
IPL Match CostPudhari
Published on
Updated on

IPL Match Cost: इंडियन प्रीमियर लीग म्हणजे फक्त क्रिकेट नव्हे, तर कोट्यवधी रुपयांचा खेळ आहे. 2008 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेने आज जगातील सर्वात मोठ्या T20 लीगचा मान मिळवला आहे. Board of Control for Cricket in India (BCCI) दरवर्षी या लीगचे आयोजन करते आणि स्पॉन्सरशिप, मीडिया राइट्स आणि तिकीट विक्रीतून मोठी कमाई करते. पण या कमाईमागे खर्च किती होतो, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे.

स्टेडियम बुकिंगपासून खर्चाची सुरुवात

IPL चा सामना आयोजित करण्यासाठी सर्वात आधी स्टेडियमची निवड आणि बुकिंग केली जाते. एका सामन्यासाठी स्टेडियमचे भाडे साधारणपणे ₹50 लाख ते ₹1 कोटी दरम्यान असते. हे शुल्क वेगवेगळ्या शहरांनुसार बदलू शकते.

खेळाडूंच्या मानधनावर मोठा खर्च

प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर मानधन दिले जाते. प्लेइंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेअर मिळून 12 खेळाडूंना प्रत्येकी सुमारे ₹7.5 लाख दिले जातात.

म्हणजे एका संघाचा फक्त खेळाडूंच्या पगारावरच सुमारे ₹90 लाख खर्च होतो. याशिवाय कोचिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, ट्रेनर यांचे वेतनही वेगळे असते.

IPL Match Cost
Shreyas Iyer Fine: दुहेरी शिक्षा... दोन सामन्यात 36 लाखांच नुकसान; श्रेयस अय्यरचं कुठे गंडतय?

प्रवास आणि लॉजिस्टिक्सचा खर्च

संघांच्या प्रवास, हॉटेल, सुरक्षा आणि इतर व्यवस्थापनासाठीही मोठा खर्च केला जातो. एका सामन्यासाठी हा खर्च साधारण ₹7 लाखांच्या आसपास असतो.

अंपायर, मॅच रेफरी आणि आयोजन खर्च

अंपायर, मॅच रेफरी आणि इतर अधिकाऱ्यांचे मानधन, सुरक्षा व्यवस्था, लाईटिंग, ग्राउंड स्टाफ आणि आयोजन खर्च हे सर्व मिळून मोठा खर्च होतो.

IPL Match Cost
Gold Buying Rules: सरकारने केली मोठी घोषणा! सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

एकूण खर्च किती?

ब्रॉडकास्टिंग राइट्स वगळता, एका IPL सामन्याचा एकूण खर्च साधारणपणे ₹15 कोटींच्या आसपास जातो. हा आकडा ऐकून थक्क व्हायला होतं, पण त्याच वेळी IPL मधील कमाईही प्रचंड असल्यामुळे हा खर्च सहज भरून निघतो.

IPL हा फक्त क्रिकेट स्पर्धा नसून एक मोठा बिझनेस आहे. एका सामन्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतो, पण त्यातून मिळणारी कमाई त्याहूनही मोठी असते. यामुळेच IPL आज जगातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news