Viral Video IPL 2025 | विराटने केएल राहुलला चिडवलं; 'हे माझं ग्राऊंड' सेलिब्रेशनची केली नक्कल

Virat Kohli | सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Virl Video IPL 2025 | Virat Kohli Mimics Rahul Celebration
Virl Video IPL 2025 | विराटने केएल राहुलला चिडवलं; 'हे माझं ग्राऊंड' सेलिब्रेशनची केली नक्कल file photo
Published on
Updated on

IPL Virat Kohli Mimics Rahul Celebration Viral Video

दिल्ली : 'जहाँ मॅटर बडा, वहाँ कोहली खडा...' या समजुतीची प्रचिती पुन्हा एकदा आली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघ ३ बाद २६ असा अडचणीत असताना विराट कोहलीने कृणालला साथीला घेत संघाला विजयी केले. 'आरसीबी'ने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेटस्नी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर उडी मारली. या सामन्यात एक मजेशीर क्षण पहायला मिळाला. विजयानंतर कोहलीने आनंद साजरा करताना केएल राहुलच्या समोरच त्याच्या 'हे माझ ग्राऊंड' या सेलिब्रेशनची नक्कल करून चिडवलं.

Virl Video IPL 2025 | Virat Kohli Mimics Rahul Celebration
CSK Performance IPL 2025 : ..तर धोनीचा विषय संपणार! चेन्नई सुपर किंग्जसाठी अजूनही आशेचा किरण?

केएल राहुलला करून दिली 'त्या' सेलिब्रेशनची आठवण

आयपीएल मध्ये रविवारी हा सामना विराट कोहलीच्या 'होम ग्राउंड'वर म्हणजेच दिल्लीमध्ये पार पडला. विजयानंतर कोहलीने मजेशीर पद्धतीने केएल राहुलला त्याने बेंगळुरूमध्ये केलेल्या सेलिब्रेशनची आठवण करून देत त्याच्यासमोर आपल्या खास शैलीत सेलिब्रेशन केले. आरसीबी आणि दिल्ली यांच्यात बेंगळुरूमध्ये एक सामना झाला होता. त्या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा पराभव केला होता. त्यावेळी केएल राहुलने सेलिब्रेशन करताना कांतारा चित्रपटातील एका प्रसंगाची नक्कल केली होती. कोहलीने रविवारी दिल्लीमध्ये राहुलच्या समोर त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्यावर राहुलने हसून प्रतिसाद दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सोशल मीडियावर दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दिल्लीवरील विजयाने 'आरसीबी' टॉपवर

दिल्ली कॅपिटल्सच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सुरुवात खराब झाली होती. विराटने ५१, तर कृणाल पंड्याने ७३ धावा केल्या. या दोघांनी केलेल्या ११९ धावांच्या भागीदारीमुळे 'आरसीबी'ने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेटस्नी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

RCB vs DC match highlights

  • दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 8 गडी गमावत 162 धावा केल्या.

  • आरसीबीने 4 गडी राखून 165 धावा करत विजय मिळवला.

  • विराट कोहलीने 47 चेंडूत 51 धावा करत अर्धशतक साजरे केले.

  • क्रुणाल पांड्याची शानदार खेळी आणि 'प्लेअर ऑफ द मॅच'चा सन्मान.

  • या विजयासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचली.

  • दिल्ली कॅपिटल्स सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

Virl Video IPL 2025 | Virat Kohli Mimics Rahul Celebration
Abhishek Nayar Mentor : टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर अभिषेक नायर बनला ‘मुंबई’चा मेंटॉर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news