Virat Kohli IPL Retirement : विराट IPL मधून होणार निवृत्त.. RCB चा करार नूतनीकरण करण्यास दिला नकार?

यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.
Virat Kohli IPL Retirement
Virat Kohli IPL Retirement virat Kohli
Published on
Updated on

Virat Kohli IPL Retirement :

सोशल मीडियावरून विराट कोहली आता आयपीएलमधून निवृत्ती घेणार. त्यानं रॉयल चॅलेंजर बंगळुरूसोबतचा करार वाढवण्यास नकार दिला आहे असे वृत्त येत आहे. याचबरोबर रेव्हस्पोर्ट्सचे पत्रकार रोहित जुगन यांनी देखील विराट कोहलीने आरसीबीसोबतचा व्यासायिक कराराचं नूतनीकरण केलेलं नाही असा दावा केला होता.

Virat Kohli IPL Retirement
Jasprit Bumrah DRS Row : तुम्हाला माहिती आहे आऊट आहे मात्र.... बुमराहच्या गोलंदाजीवर DRS ड्रामा; विंडीजचं कडवं प्रत्युत्तर

यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यानं आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओत बोलताना सांगितलं की, 'विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यासायिक करार करण्यास नकार दिला आहे असं वृत्त आहे. मात्र त्याचा अर्थ काय आहे? तो नक्कीच आरसीबीकडून खेळेल. जर तो खेळणार असेल तर तो नक्कीच आरसीबीकडूनच खेळेल.'

आकाश चोप्रा पुढं म्हणाला, 'त्यानं नुकतीच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर तो फ्रेंचायजी का सोडेल. तो कुठंही जाणार नाही. करार नाकारल्याचा फक्त अंदाज आहे. काय सांगावं त्याकडं दोन करार असतील. व्यासायिक करार हा प्लेईंग करारापेक्षा वेगळा असतो. त्यानं व्यासायिक करार नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. आरसीबी फ्रेंजायजी विक्रीला काढल्याचे देखील वृत्त आहे.'

Virat Kohli IPL Retirement
Virat- Rohit ODI selection : "विराट-राेहितशी पंगा घेवू नका" : अजित आगरकरांना माजी क्रिकेटपटूने दिला इशारा

मेगा लिलावानंतर आयपीएलमधील खेळाडूंसोबत एका वर्षाचा करार केला जातो. मात्र फ्रेंचायजी त्यांना पुढं रिटेन करू शकते. विराट कोहलीने आरसीबीच्या २०२५ च्या आयपीएल विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यानंतर फ्रेंचायजीनं आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. गेल्या हंगामात त्यानं १५ सामन्यात ६५७ धावा केल्या होत्या. त्यानं या धावा ५४.७५ च्या सरासरीनं आणि १४४.७१ च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. यात त्याच्या नावावर आठ अर्धशतकी खेळींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news