

Jasprit Bumrah DRS Row :
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावला आहे. सलामीवीर जॉन कॅम्पबेलनं ११५ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर होप देखील शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. विंडीजनं उपहारापर्यंत ३ बाद २५२ धावा केल्यात.
फॉलोऑनची नामुष्की ओढवलेल्या विंडीजनं आपल्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा चांगलाच प्रतिकार केला आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्या डावात फारसं यश मिळवता आलं नाही. दुसऱ्या डावत देखील चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत विकेटलेस होता.
बुमराहनं विंडीजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलला जवळपास बाद केलंच होतं. मात्र DRS नंतर तिसऱ्या पंचांनी कॅम्पबेलला नाबाद ठरवलं. यानंतर बुमराह आणि फिल्ड अंपायर यांच्यात बराचकाळ चर्चा झाली. मात्र याचं फलीत काही बुमराहच्या बाजूनं निघालं नाही.
बुमराहचा चेंडू फलंदाजी करणाऱ्या कॅम्पबेलच्या पॅडवर आदळला होता. त्यानंतर बुमराहनं जोरदार अपिल केली. मात्र फिल्ड अंपायरनं कॅम्पबेलला नाबाद ठरवलं. टीम इंडियानं DRS घेतला. मात्र त्यात चेंडू आधी पॅडला लागला की बॅटला हे स्पष्ट होत नव्हत. मात्र अंपायर्स कॉलवर कॅम्पबेल नाबाद ठरला.
यानंतर नाराज बुमराह आपल्या बॉलिंग मार्कवर परतू लागला. त्यावेळी त्यानं अंपायरला आपलं मत स्पष्टपणे सांगितलं. तो म्हणाला, 'तुम्हाला माहिती आहे की हा आऊट आहे. मात्र तंत्रज्ञान हे सिद्ध करू शतक नाही.' समालोचकांनी देखील बुमराहचीच री ओढली. मात्र ही चर्चा काही निर्णय बदलू शकत नाही.
जॉन कॅम्पबेलचं हे कसोटीमधलं पहिलं शतक ठरलं. मात्र ११५ धावांवर असताना रविंद्र जडेजानं त्याला पायचीत पकडलं. यावेळी मात्र अंपायरनं भारताची बाजू उचलून धरली. कॅम्पबेलनं रिव्ह्यू घेतला. मात्र हा रिव्ह्यू त्याला जीवनदान देऊ शकला नाही.