Vaibhav Suryavanshi: 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6.. वैभवच्या धमाकेदार खेळीनंतर विराट कोहलीने दिलं खास गिफ्ट; काय म्हणाला?

Vaibhav Suryavanshi IPL 2026: वैभव सूर्यवंशीने RCB विरुद्ध 78 धावांची तुफानी खेळी करत सामना जिंकून दिला. या कामगिरीनंतर विराट कोहलीने त्याच्या कॅपवर ऑटोग्राफ दिला.
Virat Kohli Vaibhav Suryavanshi
Virat Kohli Vaibhav Suryavanshi Pudhari
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या तडाखेबाज खेळीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या दमदार प्रदर्शनानंतर त्याला एक खास गिफ्ट मिळालं आहे. हे गिफ्ट त्याला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि Royal Challengers Bengaluru यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला वैभव सूर्यवंशी. अवघ्या 26 चेंडूंमध्ये 78 धावा करत त्याने RCB च्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. या कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारही देण्यात आला.

Virat Kohli Vaibhav Suryavanshi
RR vs RCB | वरुणराजानंतर वैभव बरसला; 26 चेंडूंत 78 धावांची स्फोटक खेळी

मात्र सामन्यानंतर घडलेली एक गोष्ट वैभवसाठी खास ठरली. भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहलीने वैभवला एक विशेष भेट दिली. कोहलीने वैभवच्या कॅपवर स्वतःचा ऑटोग्राफ दिला आणि त्यावर “Dear Vaibhav, Well Done” असा खास मेजेजही लिहिला. वैभवने ही आठवण आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून, ती सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Virat Kohli Vaibhav Suryavanshi
Rishabh Pant : 'बेजबाबदार' खेळीनंतर ऋषभ पंतवर टीकेची झोड: ‘अशाने तुम्ही संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही’

या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला असून, तो आयपीएल 2026 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंतच्या 4 सामन्यांत त्याने 50 च्या सरासरीने आणि तब्बल 266.67 च्या स्ट्राइक रेटने 200 धावा केल्या आहेत.

15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यामुळे तो भारतीय क्रिकेटचा भविष्यातील मोठा स्टार ठरणार, यात शंका नाही. त्याच्या या कामगिरीमुळे आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजाकडून मिळालेल्या कौतुकामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news