Shikhar Dhawan's Irish Girlfriend : शिखर धवन झाला ‘येडा पिसा’! आयरीश पोरीत ‘गुंतला जीव’, गब्बरकडून नव्या प्रेमावर मोहर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज शिखर धवनने 2023 मध्ये आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला. यानंतर, त्याचे नाव सोफी शाईनशी जोडले गेले.
shikhar dhawan's new irish girlfriend sophie shine
Published on
Updated on

shikhar dhawan's new irish girlfriend who is sophie shine all you need to know

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ या नावाने ओळखला जाणारा शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी तो मैदानावरील चौकार-षटकारांमुळे नव्हे, तर त्याच्या आयुष्यात आगमन झालेल्या नव्या गर्लफ्रेंडमुळे! सोशल मीडियावर नुकतीच शिखरने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आपल्या नव्या गर्लफ्रेंडसोबतचा एक खास फोटो देखील शेअर केला असून तिचं नावही उघड केलं आहे.

कोण आहे सोफी शाइन?

सोफी शाइन ही एक फिटनेस कोच, योगा ट्रेनर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती खरंतर मूळची आयर्लंडची आहे. ती अनेक फिटनेस ब्रँड्ससोबत ती काम करते. व्यवसायाने ती एका मोठ्या कंपनीत उत्पादन सल्लागार आहे. सोफीने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमध्येही तिचे शिक्षण झाले आहे. सध्या, सोफी यूएईच्या नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिचे येथे सुमारे 1.33 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या जीवनशैलीमुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

shikhar dhawan's new irish girlfriend sophie shine
Vaibhav Suryavanshi International Debut : वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ICCचा अडथळा! जाणून घ्या नियम

धवनची सोशल मीडिया पोस्ट

‘New beginnings ❤️ Grateful for this beautiful soul in my life – @SophieShine’

या पोस्टने लगेचच सोशल मीडियावर ट्रेंड पकडला आणि चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छांचा वर्षाव केला.

पूर्वीचे नाते आणि पुढचा टप्पा

शिखर धवनचा त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. धवनने 2012 मध्ये आयेशा मुखर्जी हिच्याशी लग्न केले होते. ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. ती एक किकबॉक्सर होती. धवन आणि आयेशा यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव झोरावर आहे. पण, धवन आणि आयेशा यांचा काडी मोड झाल्यानंतर 2023 मध्ये हे जोडपे विभक्त झाले. घटस्फोटानंतर तो पूर्णपणे क्रिकेट आणि वैयक्तिक प्रगतीत व्यस्त राहिला. आता त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाने प्रवेश केला आहे आणि तो मनमोकळेपणाने या नात्याचा स्वीकार करताना दिसत आहे.

shikhar dhawan's new irish girlfriend sophie shine
Glenn Maxwell ruled out of IPL : जातो बाबा.. काय जमेना खेळायला! ग्लेन मॅक्सवेलची IPL मधून अचानक आघार

जोडीमधील केमिस्ट्री सुपरहिट!

धवन आणि सोफीने एकत्रित शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसते. हास्य, आत्मविश्वास आणि परस्पर सन्मान याने भरलेली ही जोडी लवकरच ‘पॉवर कपल’ म्हणूनही ओळखली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news