Vaibhav Suryavanshi Video: ‘सुपरमॅन’ वैभव सूर्यवंशीचा हवेत घेतलेला कॅच व्हायरल; टीकाकारांना मैदानातच दिलं उत्तर

Vaibhav Suryavanshi Catch Video: भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यातील सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Vaibhav Suryavanshi Catch Video
Vaibhav Suryavanshi Catch VideoPudhari
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi Catch Video: श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेत भारत अ संघाने अफगाणिस्तान अ संघावर 101 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या एका अफलातून कॅचची.

आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आलेल्या वैभवच्या फिटनेस आणि क्षेत्ररक्षण क्षमतेवर काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने घेतलेल्या एका कॅचने सर्व टीकाकारांना मैदानावरच उत्तर दिले.

भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करत 9 बाद 319 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार तिलक वर्मा (59), प्रियांश आर्य (58) आणि कुमार कुशाग्र (58) यांनी अर्धशतके झळकावली. वैभव सूर्यवंशीनेही अवघ्या 28 चेंडूत 38 धावांची झंझावाती खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. 320 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान अ संघाचा डाव 218 धावांत आटोपला. भारताकडून निशांत सिंधूने 4 तर यश ठाकूरने 2 बळी घेतले.

मात्र सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला तो वैभव सूर्यवंशीचा अविश्वसनीय झेल. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर फलंदाज खालिद तनिवलने शॉट मारला चेंडू हवेत उंच गेला आणि उभ्या असलेल्या वैभवने क्षणाचाही विलंब न करता हवेत झेप घेत चेंडू आपल्या ताब्यात घेतला. त्याचा हा कॅच पाहून मैदानावरील खेळाडूंसह प्रेक्षकही थक्क झाले.

हा कॅच वैभवच्या फिटनेस आणि क्षेत्ररक्षणावर टीका करणाऱ्यांना दिलेले जोरदार प्रत्युत्तर होते. त्याची चपळता, अचूक टायमिंग आणि कमिटमेंट या कॅचमधून स्पष्टपणे दिसून आली.

फलंदाजीत मात्र वैभवला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीदून दाऊदजई याच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. तरीही त्याच्या 38 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

Vaibhav Suryavanshi Catch Video
TG20 League Controversy: सिराज, तिलक वर्मा आणि रायुडूला कायदेशीर नोटीस; विजय देवरकोंडाही अडचणीत, काय आहे TG20 प्रकरण?

सध्या सुरू असलेल्या या मालिकेत वैभव सूर्यवंशीला अपेक्षित मोठी खेळी करता आलेली नसली, तरी त्याच्या खेळातील आत्मविश्वास आणि मैदानावरील ऊर्जा कायम दिसून येत आहे. चार सामन्यांत त्याने 117 धावा केल्या आहेत. मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात तो अपयशी ठरत असला, तरी BCCI मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

अंतिम फेरीपूर्वी वैभवचा हा सुपरमॅन झेल सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून, क्रिकेट चाहत्यांकडून त्याचे जोरदार कौतुक होत आहे. "फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही तो भविष्यात मोठा स्टार ठरू शकतो," अशी प्रतिक्रिया अनेक क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news