Vaibhav Sooryavanshi | "शेवटी आम्‍हाला भाग पाडले..." : वैभव सूर्यवंशीच्‍या निवडीबाबत अजित आगरकरांचा मोठा खुलासा

Ajit Agarkar on Vaibhav Sooryavanshi selection : १५ वर्षांच्या 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीला प्रथमच भारताच्या वरिष्ठ टी-२० संघात स्थान
Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection
वैभव सूर्यवंशीच्‍या टीम इंडियातील निवडीबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांनी मोठा खुलासा केला आहे.Pudhari
Published on
Updated on

Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड, इंग्लंड आणि जपानमधील २०२६ च्या आशियाई क्रिकेट स्‍पर्धेसाठी खेळांसाठी भारतीय पुरुष संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या दौऱ्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर अवघ्या १५ वर्षांच्या 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारताच्या वरिष्ठ टी-२० संघात स्थान मिळाले आहे.

१५ वर्षांच्या वैभवची निवड ठरली लक्षवेधी

या संपूर्ण संघ निवडीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने. राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाने गेल्या एका वर्षात केलेल्‍या अफलातून कामगिरीने तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात आश्वासक खेळाडू म्हणून समोर आला आहे.

Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection
India T20 Squad: वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराला डच्चू... मुंबई इंडियन्सचे दिग्गज 'त्रिकूट' संघाबाहेर; नवा कर्णधार नवी टीम

अंडर-19 संघात वैभवची चमकदार कामगिरी

भारताने २०२६ चा आयसीसी अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात वैभवने महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे त्याला 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' आणि 'प्लेअर ऑफ द फायनल' या दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. हाच फॉर्म त्याने आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्येही कायम ठेवला. आयपीएलमध्ये त्याने २३७.३० च्या अद्भूत स्ट्राईक रेटने तब्बल ७७६ धावा कुटल्या आणि निवडकर्त्यांना विचार करण्यास भाग पाडले.

Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection
Vaibhav Suryavanshi IPL 2026 Record |वैभव सूर्यवंशीचा नवा धमाका; ५१४ चेंडूत प्रस्थापित केला नवा विक्रम !

'वैभवने आम्हाला त्याला निवडायला भाग पाडले': अजित आगरकर

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत बोलताना म्‍हणाले की, वैभव सूर्यवंशीच्‍या दमदार कामगिरीमुळे निवडकर्त्यांसमोर त्याला संघात घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. वैभवच्या कामगिरीने आम्हाला त्याला निवडायला एकप्रकारे भागच पाडले. मला माहीत आहे की तो खूप लहान आहे; पण लागोपाठ दोन आयपीएल सीझन आणि अंडर-१९ स्तरावर त्याने जे काही केले आहे, ते स्वतःच सर्वकाही सांगून जाते. त्याच्यामध्ये किती मोठी गुणवत्ता आहे, हे आपण सर्वजण पाहू शकतो."

Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection
IPL 2026 Longest Six | वैभव सूर्यवंशी किंवा अभिषेक शर्मा नाही, यंदा IPL मध्ये 'या' खेळाडूंनी ठोकला सर्वात लांब षटकार!

त्‍याने आपल्‍या कामगिरीच्‍या जोरावर स्वतःची जागा निर्माण केली

आता भविष्‍यात वैभव समोर आणखी कठीण आव्हाने असतील, पण त्याने उत्कृष्ट खेळ आणि संयम दाखवला आहे. जितक्या अपेक्षा इतरांना आहेत, तितक्याच आम्हांलाही आहेत. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःची जागा निर्माण केली आहे."

Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection
IPL 2026 मध्ये षटकारांचा 'महाविक्रम' निघाला मोडीत! वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्माचा धुमाकूळ; जाणून घ्‍या टॉप-५ खेळाडू

आयर्लंड आणि इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, टिळक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

Ajit Agarkar on Vaibhav Suryavanshi selection
IPL New Records : वैभव सूर्यवंशीची पराक्रम... उर्विल पटेलचा धमाका! जाणून घ्या IPL 2026 च्या लीग स्टेजमधील ५ ऐतिहासिक विक्रम

आशियाई आशियाई क्रिकेट स्‍पर्धेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, जसप्रीत बुमराह.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news