Vaibhav Sooryavanshi Yuvraj Advice : गुरू युवराजने ३० मिनिटे दिला गुरूमंत्र! शिष्य वैभवने अख्ख क्रिकेट विश्वच हादरवून सोडलं

Vaibhav Sooryavanshi : या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने एका व्हिडिओत आपण सामन्यापूर्वी कशी तयारी केली याची माहिती दिली.
Vaibhav Sooryavanshi Yuvraj Advice
Vaibhav Sooryavanshi Yuvraj Advicepudhari
Published on: 
Updated on: 

Vaibhav Sooryavanshi Yuvraj Singh Advice: भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत युएई विरूद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत द्विशतक ठोकून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्याने या सामन्यात लिस्ट ए स्पर्धेत सर्वात वेगवान शतक, सर्वात वेगवान दिडशतक, आणि सर्वात वेगवान द्विशतकाचा मान पटकावला. तसेच एका इनिंगमध्ये सर्वाधिक २८ षटकार मारण्याचा पराक्रम देखील केला. भारताने हा सामना फक्त १४.१ षटकात २५० धावा चेस करून खिशात टाकला.

Vaibhav Sooryavanshi Yuvraj Advice
Vaibhav Sooryavanshi Records: वैभव जरा दमानं... एवढं कोण मारतंय होय... सर्वात वेगवान शतक, दीडशतक अन् द्विशतकही; षटकारांचं तर बोलूच नका

या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने एका व्हिडिओत आपण सामन्यापूर्वी कशी तयारी केली याची माहिती दिली. त्यावेळी त्याने आपण सामन्यापूर्वी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगशी बोलला असल्याचे सांगितलं. त्याने दिलेला सल्ला उपयोगी पडल्याचे सूर्यवंशीने सांगितलं.

Vaibhav Sooryavanshi Yuvraj Advice
Vaibhav Sooryavanshi : 'बेबी बॉक्स'चा मोठा धमाका! वैभव सूर्यवंशीने झळकावले 'विक्रमी' द्विशतक, जागतिक विक्रम तुडवला पायदळी

युवराजचा तो सल्ला मानला

वैभव सूर्यवंशीने म्हणाला की मी सामन्यापूर्वी चार लोकांशीच बोललो होतो. पहिले म्हणजे माझे वडील, माझा एक अंडर १९ चा मित्र, बालपणीचे कोच आणि युवराज सिंग यांच्याशी माझे बोलणे झाले होते. वैभव सूर्यवंशी युवराज सिंगला आपला आयडल मानतो.

वैभव म्हणाला की, मी युवराजशी माझ्या फलंदाजीतील अडचणींबाबत खुलेपणाने चर्चा केली होती. त्यावेळी युवराजने काही टेक्निक मला समजावून सांगितल्या होत्या. तसेच काही सल्ले देखील दिले होते. वैभवने सांगितले की युवराज सिंगने मला सांगितलं होतं की जर तू २० चेंडू खेळतोस तर तू ते चेंडू वेगळ्या पद्धतीनं खेळ. युवराजचा हा सल्ला वैभवला चांगलाच कामी आला असं वैभव सांगतो.

Vaibhav Sooryavanshi Yuvraj Advice
Asia Cup Rising Stars 2026: पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधी मिळणार.. भारत-पाक पुन्हा भिडणार, सेमी फायनलचं वेळापत्रक जाहीर

जुने व्हिडिओ पाहिले

वैभवने युवराज सिंग हा आपला आदर्श असून त्यांने दिलेला सल्ला मी माझ्या फलंदाजीत उपयोगी आणण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. तसेच वैभवने आपल्या जुन्या चुका सुधारण्यासाठी आधीच्या सामन्यांचे व्हिडिओ पाहिले. त्यानंतर फलंदाजी करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत हे समजून घेतलं अन् त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असं देखील वैभव सांगतो.

वैभवची ही सरावावेळी केलेली तयारी सामन्यावेळी दिसून आली. त्याने युईएच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. त्याने ५३ चेंडूत २०४ धावांची ऐतिहासिक खेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.