VIDEO: अंपायरचं पण ऐकलं नाही... LIVE सामन्यात मोठा वाद; आरसीबीच्या खेळाडूला शिक्षा होणार?

Tim David Controversy IPL: टिम डेव्हिडने सामन्यादरम्यान चेंडू स्वतः तपासण्याचा प्रयत्न केला. अंपायरनी रोखूनही त्याने ऐकले नाही, त्यामुळे वाद निर्माण झाला.
Tim David IPL Controversy
Tim David IPL ControversyPudhari
Published on
Updated on

Tim David Controversy IPL Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात RCB ने 18 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यातील एका घटनेमुळे RCB चा खेळाडू टिम डेव्हिड चर्चेत आला आहे.

सामन्यादरम्यान RCB च्या डावातील 18व्या षटकात हा प्रकार घडला. टिम डेव्हिड फलंदाजी करत असताना त्याने चेंडूच्या आकारावर आक्षेप घेतला आणि तो स्वतः तपासू लागला. अंपायरनी त्याला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. इतकंच नाही, तर अंपायरांनी चेंडू परत मागितला तरीही त्याने तो लगेच दिला नाही आणि स्वतःच तपासणी करत राहिला.

Tim David IPL Controversy
MI vs RCB | मुंबईच्या मैदानात आरसीबीची बाजी!

या प्रकारामुळे मैदानावर काही काळ गोंधळ निर्माण झाला. अखेर अंपायरनी त्याला फटकारले आणि खेळ पुन्हा सुरू झाला. मात्र, हे प्रकरण इथेच थांबणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

क्रिकेटच्या नियमांनुसार चेंडूची तपासणी करण्याचा अधिकार फक्त अंपायरला असतो. खेळाडूने अशा प्रकारे हस्तक्षेप करणे नियमबाह्य मानले जाते. तसेच, या प्रकारामुळे खेळाचा वेळही वाया गेला, जो IPL च्या आचारसंहितेचा भंग आहे.

Tim David IPL Controversy
Virat Kohli: कोहलीचा संयम सुटला; हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकले, पाहा वानखेडेवर नेमकं काय घडलं!

त्यामुळे आता मॅच रेफरीकडे या प्रकरणाची तक्रार गेल्यास टिम डेव्हिडवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. दंड किंवा इतर शिक्षा होऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, टिम डेव्हिडने या सामन्यात 16 चेंडूत नाबाद 34 धावा करत RCB च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्याच्या या वादग्रस्त कृतीमुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news