

मुंबई : ‘गल्ली क्रिकेट’, ‘स्ट्रीट क्रिकेट’ला व्यावसायिक आणि ग्लॅमरस स्वरूप देणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या तिसऱ्या पर्वाचा थरार लवकरच सुरू होत आहे. ९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर या ‘टेनिस बॉल T10’ क्रिकेट स्पर्धेचे सामने रंगणार आहेत.
मुंबईमध्ये ९ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींनी मिळून तब्बल १० कोटी रुपये खर्च करून १४४ खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. यंदा दोन नवीन संघ अहमदाबाद लायन्स (Ahmedabad Lions) आणि दिल्ली सुपरहिरोज (Delhi Superheros) सामील झाल्यामुळे या स्पर्धेचा डंका आता ८ संघांमध्ये वाजणार आहे.
यंदाच्या लिलावात अनेक स्थानिक खेळाडूंवर मोठी बोली लागली. गतविजेत्या माझी मुंबई (Majhi Mumbai) संघाने विजय पावलेला या खेळाडूवर सर्वाधिक ३२.५ लाख रुपये खर्च केले आणि त्याला आपल्या संघात घेतले. दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला तो केतन म्हात्रे. त्याला चेन्नई सिंगम्सने (Chennai Singams) ‘राईट टू मॅच’चा वापर करत २६.४ लाख रुपयांमध्ये कायम ठेवले. यंदाच्या लिलावात सर्वाधिक खर्च फाल्कन्स रायझर्स हैदराबाद (Falcons Risers Hyderabad) संघाने केला. त्यांनी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी तब्बल १.४७ कोटी खर्च केले.
जर तुम्ही या जबरदस्त 'स्ट्रीट क्रिकेट' ॲॅक्शनचे साक्षीदार होण्यास उत्सुक असाल, तर थेट प्रक्षेपण (Live Telecast) आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची (Live Streaming) संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :
थेट प्रक्षेपण (Live Telecast) : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)
लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) : जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइट (JioHotstar app and website)
९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील प्रमुख सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. दररोज एक किंवा दोन सामन्यांचा थरार पाहायला मिळेल.
जानेवारी ९ : माझी मुंबई vs दिल्ली सुपरहिरोज : रात्री ८ ते १०
जानेवारी १० : श्रीनगर के वीर vs अहमदाबाद लायन्स : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी १० : टायगर्स ऑफ कोलकाता vs चेन्नई सिंगम्स : रात्री ८ ते १०
जानेवारी ११ : अहमदाबाद लायन्स vs दिल्ली सुपरहिरोज : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी ११ : फाल्कन्स रायझर्स हैदराबाद vs बंगळूर स्ट्रायकर्स : रात्री ८ ते १०
जानेवारी १२ : श्रीनगर के वीर vs माझी मुंबई : रात्री ८ ते १०
जानेवारी १३ : बंगळूर स्ट्रायकर्स vs दिल्ली सुपरहिरोज : रात्री ८ ते १०
जानेवारी १४ : माझी मुंबई vs फाल्कन्स रायझर्स हैदराबाद : रात्री ८ ते १०
जानेवारी १५ : बंगळूर स्ट्रायकर्स vs टायगर्स ऑफ कोलकाता : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी १५ : चेन्नई सिंगम्स vs फाल्कन्स रायझर्स हैदराबाद : रात्री ८ ते १०
जानेवारी १६ : श्रीनगर के वीर vs टायगर्स ऑफ कोलकाता : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी १६ : माझी मुंबई vs अहमदाबाद लायन्स : रात्री ८ ते १०
जानेवारी १७ : चेन्नई सिंगम्स vs माझी मुंबई : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी १७ : अहमदाबाद लायन्स vs बंगळूर स्ट्रायकर्स : रात्री ८ ते १०
जानेवारी १८ : माझी मुंबई vs श्रीनगर के वीर : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी १८ : दिल्ली सुपरहिरोज vs फाल्कन्स रायझर्स हैदराबाद : रात्री ८ ते १०
जानेवारी १९ : अहमदाबाद लायन्स vs चेन्नई सिंगम्स : रात्री ८ ते १०
जानेवारी २० : दिल्ली सुपरहिरोज vs चेन्नई सिंगम्स : रात्री ८ ते १०
जानेवारी २१ : फॅल्कन रायझर्स हैदराबाद vs श्रीनगर के वीर : रात्री ८ ते १०
जानेवारी २२ : दिल्ली सुपरहिरोज vs अहमदाबाद लायन्स : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी २२ : चेन्नई सिंगम्स vs बंगळूर स्ट्रायकर्स : रात्री ८ ते १०
जानेवारी २३ : टायगर्स ऑफ कोलकाता vs माझी मुंबई : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी २३ : बंगळूर स्ट्रायकर्स vs श्रीनगर के वीर : रात्री ८ ते १०
जानेवारी २४ : चेन्नई सिंगम्स vs श्रीनगर के वीर : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी २४ : फाल्कन्स रायझर्स हैदराबाद vs माझी मुंबई : रात्री ८ ते १०
जानेवारी २५ : फाल्कन्स रायझर्स हैदराबाद vs टायगर्स ऑफ कोलकाता : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी २५ : बंगळूर स्ट्रायकर्स vs चेन्नई सिंगम्स : रात्री ८ ते १०
जानेवारी २६ : दिल्ली सुपरहिरोज vs टायगर्स ऑफ कोलकाता : रात्री ८ ते १०
जानेवारी २७ : फाल्कन्स रायझर्स हैदराबाद vs श्रीनगर के वीर : रात्री ८ ते १०
जानेवारी २८ : अहमदाबाद लायन्स vs बंगळूर स्ट्रायकर्स : रात्री ८ ते १०
जानेवारी २९ : श्रीनगर के वीर vs दिल्ली सुपरहिरोज : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी २९ : टायगर्स ऑफ कोलकाता vs माझी मुंबई : रात्री ८ ते १०
जानेवारी ३० : दिल्ली सुपरहिरोज vs चेन्नई सिंगम्स : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी ३० : श्रीनगर के वीर vs टायगर्स ऑफ कोलकाता : रात्री ८ ते १०
जानेवारी ३१ : बंगळूर स्ट्रायकर्स vs दिल्ली सुपरहिरोज : सायं ५:३० ते ७:३०
जानेवारी ३१ : अहमदाबाद लायन्स vs फाल्कन्स रायझर्स हैदराबाद : रात्री ८ ते १०
फेब्रुवारी १ : टायगर्स ऑफ कोलकाता vs अहमदाबाद लायन्स : सायं ५:३० ते ७:३०
फेब्रुवारी १ : माझी मुंबई vs बंगळूर स्ट्रायकर्स : रात्री ८ ते १०
फेब्रुवारी २ : चेन्नई सिंगम्स vs अहमदाबाद लायन्स : सायं ५:३० ते ७:३०
फेब्रुवारी २ : टायगर्स ऑफ कोलकाता vs फाल्कन्स रायझर्स हैदराबाद : रात्री ८ ते १०