

T20 World Cup 2026 Video: श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानचा २ विकेट्सनी पराभव झाला असून इंग्लंडने आपलं सेमी फायनलमधील तिकीट पक्क केलं आहे. खेळ म्हटलं की कोणाचा विजय तर कोणाचा पराभव हा होत असतो. हा पराभव पचवणं गरजेचं असतं. मात्र पाकिस्तानच्या रडक्या चाहत्याला पाकिस्तानचा हा पराभव काही पचनी पडला नाही. तो तावा तावानं इंग्लंडच्या चाहत्याशी भिडला. मात्र इंग्लंडच्या या चाहत्यांन त्याची लायकी त्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
इंग्लंड - पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १६४ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक्सने धडाकेबाज शतक ठोकले. या जोरावर इंग्लंडनं सामना २ विकेट्सनं जिंकला. जवळ आलेल्या सामना गमावला तरी पाकिस्तान संघानं फार अकड न दाखवता इंग्लंडच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं.
मात्र पाकिस्तानच्या चाहत्याला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. तो इंग्लंडच्या समर्थकाशी भिडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र इंग्लंडच्या चाहत्यानं पाकिस्तानच्या या रडक्या चाहत्याला त्याची लायकी दाखवून दिली. या पाकिस्तानी चाहत्याचं नाव जुहैन अहमद असून तो एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे.
अहमद हा पाकिस्तानच्या समर्थनात एक व्हिडिओ तयार करत होता. तो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी विदेशी क्रिकेट चाहत्यांशी कायम पंगा घेत असतो. मात्र तो कायम आपलं हसं करून घेतो. मात्र या अहमदनं कधी भारतीय चाहत्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
ज्यावेळी या अहमदनं इंग्लंडच्या चाहत्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इंग्लंडच्या चाहत्यानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. इंग्लंडचा हा चाहता इतका बलदंड होता की पाकिस्तानी चाहत्याला तो सहज चिरडू शकला असता. इंग्लंडचा हा चाहता पाकिस्तानी चाहत्याच्या जवळ जात आहे हे दिसताच श्रीलंकेचा चाहता मधे पडला नाही तर पाकिस्तानी चाहत्याचं काही खरं नव्हतं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.