T20 World Cup 2026 : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान

वानखेडेवर फिरकीची जादू चालवण्यासाठी 3 फिरकीपटूंना संधी
T20 World Cup 2026 : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान
Published on
Updated on

मुंबई : भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेत दोन वेळा जगज्जेतेपद भूषवणारा इंग्लंडचा संघ ८ फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सलामीच्या लढतीसाठी इंग्लंडने आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, यात एका दिग्गज वेगवान गोलंदाजाला स्थान देण्यात आले आहे.

आर्चरचे पुनरागमन; तीन फिरकीपटूंना संधी

नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडने संतुलित गोलंदाजी फळी निवडली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार असून, येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. अशा स्थितीत गोलंदाजांवर असलेला अतिरिक्त दबाव लक्षात घेता, इंग्लंडने स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिले आहे. आर्चरसोबत वेगवान गोलंदाजीची धुरा ल्यूक वूड सांभाळेल.

T20 World Cup 2026 : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान
IND vs PAK T20 WC : श्रीलंकेसमोर झुकला पाकिस्तान..! एका पत्रानंतर गुडघे टेकले, भारताविरुद्ध खेळण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू

वानखेडेवर फिरकीची जादू चालवण्यासाठी इंग्लंडने आदिल रशीद, लियम डॉसन आणि विल जॅक्स या तीन फिरकीपटूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान देऊन आपली रणनीती स्पष्ट केली आहे.

T20 World Cup 2026 : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान
T20 World Cup PAK vs NED | पहिल्‍याच सामन्‍यात पाकिस्‍तान थोडक्‍यात बचावला, नेदरलँडविरुद्‍ध निसटता विजय!

धडाकेबाज फलंदाजीवर मदार

इंग्लंडच्या फलंदाजीची कणा फिल सॉल्ट आणि जोस बटलर ही जोडी असेल. टी-२० क्रिकेटमधील सर्वात आक्रमक सलामीवीर म्हणून या दोघांची ओळख आहे. याशिवाय मधल्या फळीत जॅकब बेथेल, टॉम बँटन आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांसारखे फटकेबाज फलंदाज संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी सज्ज आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून सॅम करनला संघात स्थान मिळाले आहे.

T20 World Cup 2026 : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान
T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा धक्का! हर्षित राणानंतर जसप्रीत बुमराही संघाच्या बाहेर; काय आहे कारण?

नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 :

फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), जॅकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, ल्यूक वूड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news