T20 World Cup 2026 India: टी-20 विश्वचषक 2026 : भारताच्या घरच्या मैदानावर जेतेपद रक्षा मोहीम!

होम अडव्हांटेज, नव्या पिढीचा दम आणि बुमराहचा वेग; ‘अ’ गटात भारत सर्वात मजबूत
T20 World Cup 2026 India
T20 World Cup 2026 IndiaPudhari
Published on
Updated on

मुंबई : 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये यजमान आणि गतविजेता भारत जेतेपद राखण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. ‌‘आयसीसी‌’ने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या गट ‌‘अ‌’ (गु्रप ए) च्या विशेष आढाव्यात भारताच्या होम अडव्हांटेजवर शिक्कामोर्तब केले आहे.

T20 World Cup 2026 India
Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर खोळंबा, प्रवाशांसाठी तीन पर्यायी मार्ग जाणून घ्या

या विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे असून, भारताचे साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने मायदेशात होणार आहेत. या सामन्यांचा भारताला फायदा होणार आहे.

भारतीय संघात नव्या युगाची सुरुवात

2024 च्या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात नव्या पिढीचे वर्चस्व दिसत आहे. अभिषेक शर्मा भारताचे नवीन अस्त्र ठरत आहे. त्याने केवळ 37 सामन्यांत 194.92 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 1,267 धावा कुटल्या आहेत. शुभमन गिलची निवड न झाल्याने इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात यष्टिरक्षकासाठी चुरस असेल, तर सॅमसन सलामीला अभिषेक शर्माची साथ देण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचा वेग आणि वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री स्पिन भारतासाठी हुकमी एक्का ठरेल.

T20 World Cup 2026 India
Maharashtra Semiconductor Investment: सेमीकंडक्टर संधीचा महाराष्ट्राला सुवर्णयोग

पाकिस्तान संघाचे पुनरागमनाचे लक्ष्य

2024 च्या विश्वचषकात अमेरिका आणि भारताकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडलेला पाकिस्तान संघ आता नवीन जोमाने उतरेल. भारताविरुद्ध खेळणार नाही, असा पवित्रा जरी पाकिस्तानने घेतला असला, तरी ‌‘आयसीसी‌’ने त्यांना इशारा दिला आहे. त्यानुसार या संघाचे या स्पर्धेतील भवितव्य ठरले. पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सलमान अली आगा याच्याकडे असून, आशिया चषकातून वगळल्यानंतर बाबर आझम पुन्हा संघात परतला आहे. केवळ 21 वर्षांचा नसीम शाह पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी उत्सुक आहे.

T20 World Cup 2026 India
Maharashtra Disaster Relief Fund: नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक धोका; महाराष्ट्राला 39,492 कोटींचा विक्रमी निधी

अमेरिका संघ पुन्हा जायंट किलर ठरणार?

गेल्या विश्वचषकात पाकिस्तानला हरवून खळबळ माजवणारा अमेरिकेचा संघ यंदा परदेशी खेळपट्ट्यांवर आपली ताकद दाखवण्यास सज्ज आहे. मोनक पटेल अमेरिकेच्या फलंदाजीची धुरा सांभाळेल. सातेजा मुक्कामल्ला 21 वर्षांचा हा खेळाडू जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानी असून, त्याने हॅरी ब्रूक आणि कॅमेरून ग्रीनसारख्या खेळाडूंनाही मागे टाकले आहे.

T20 World Cup 2026 India
Sanjay Raut | प्रफुल्ल पटेल पवार कुटुंबाचे मुखिया आहेत का? राष्ट्रवादी विलीनीकरणावर संजय राऊतांचा जळजळीत सवाल

नेदरलँडस्‌‍च्या संघात धोकादायक खेळाडू

नेदरलँडस्‌‍ : स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील या संघात रोलॉफ वॅन डर मर्व हा 40 वर्षांचा अनुभवी खेळाडू आकर्षणाचे केंद्र आहे. बास डी लिडे आणि मॅक्स ओडॉड हे भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.

T20 World Cup 2026 India
JJ School of Art: ‘लोकल टू ग्लोबल’ दिशेने जे. जे. स्कूल ऑफ आर्टची वाटचाल; कला शिक्षणाला जागतिक व्यासपीठ

नामिबियाची मदार रुबेनवर

या संघाचा माजी दिग्गज खेळाडू क्रेग विल्यम्स आता मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. रुबेन ट्रम्पलमॅनच्या गोलंदाजीवर नामिबियाची मदार असेल.

भारताचे ‌‘अ‌’ गटातील सामने

तारीख सामना ठिकाण वेळ

7 फेब्रु भारत वि. अमेरिका वानखेडे स्टेडियम, मुंबई संध्या. 7.00

12 फेब्रु भारत वि. नामिबिया अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली संध्या. 7.00

15 फेब्रु भारत वि. पाकिस्तान आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो संध्या. 7.00

18 फेब्रु भारत वि. नेदरलँडस्‌‍ नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद संध्या. 7.00

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news