T20 World Cup : आर्यन, सोहैबची वादळी खेळी; यूएईचा कॅनडावर 5 गडी राखून विजय

UAE Beat Canada : सामनावीर जुनैद सिद्दीकीचे पाच बळी आणि फलंदाजांची जिद्द यामुळे यूएईने लक्ष्य 19.4 षटकांत गाठले.
UAE vs Canada T20 World Cup
Published on
Updated on

T20 World Cup Aryan and Sohaib Star as UAE Beat Canada by 5 Wickets

नवी दिल्ली : सलामीवीर आर्यन शर्मा आणि सोहैब खान यांच्यातील 84 धावांच्या धडाकेबाज भागीदारीच्या जोरावर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात कॅनडावर 5 गडी राखून मात केली. सामनावीर जुनैद सिद्दीकीचे पाच बळी आणि फलंदाजांची जिद्द यामुळे यूएईने 151 धावांचे लक्ष्य 19.4 षटकांत गाठले.

जुनैद सिद्दीकीचा भेदक मारा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कॅनडाची सुरुवात खराब झाली. अनुभवी जुनैद सिद्दीकीने सुरुवातीलाच दोन धक्के दिले. कॅनडाकडून हर्ष ठाकर याने एकाकी झुंज देत 41 चेंडूंत 50 धावांची (2 चौकार, 3 षटकार) खेळी केली. नवनीत धालीवालने 34 धावांचे योगदान दिले, मात्र तो दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. सिद्दीकीने अखेरच्या षटकांतही आपली जादू कायम ठेवत कारकिर्दीतील पहिले 5 बळी (35 धावांत 5) पूर्ण केले, त्यामुळे कॅनडा 150 धावांवर रोखला गेला.

UAE vs Canada T20 World Cup
IND vs PAK : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यावर मोठे संकट..! श्रीलंकेकडून धोक्याचा इशारा

आर्यन-सोहैबची ऐतिहासिक भागीदारी

151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 66 धावांत 4 गडी गमावल्यामुळे यूएईचा संघ अडचणीत सापडला होता. कॅनडाच्या साद बिन जफरने (14 धावांत 3) टिƒून गोलंदाजी करत यूएईला रोखले होते. कठीण स्थितीत आर्यन शर्मा (नाबाद 74) आणि सोहैब खान (51) यांनी सूत्रे हाती घेतली. विजयासाठी शेवटच्या 4 षटकांत 56 धावांची गरज असताना सोहैबने डीलन हेलिगरला दोन षटकार आणि एक चौकार मारून सामन्याचे चित्र बदलले.

UAE vs Canada T20 World Cup
IND vs PAK : उस्मान तारिकला इशान किशनचा थेट इशारा, ‘पॉज’ फिरकीला रोखण्यासाठी टीम इंडियाची 'खास' रणनीती

शेवटच्या षटकात 8 धावा हव्या असताना आर्यनने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. सोहैब अर्धशतक पूर्ण करून बाद झाला, तरी आर्यनने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील यूएईचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे. 2022 मध्ये यूएईने नामिबियाला हरवले होते.

संक्षिप्त धावफलक

कॅनडा : 20 षटकांत 7 बाद 150 (हर्ष ठाकर 41 चेंडूंत 2 चौकार, 3 षटकारांसह 50 धावा, नवनीत धालीवाल 28 चेंडूंत 4 चौकारांसह 34 धावा)

संयुक्त अरब अमिराती (यूएई) : 19.4 षटकांत 5 बाद 151 (आर्यन शर्मा 53 चेंंडूंत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 74, सोहैब खान 29 चेंडूंत 4 चौकार, 4 षटकारांसह 51 धावा)

सामनावीर : जुनैद सिद्दीकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news