Suryakumar Yadav SMT: 6,6,6,6,6,... सूर्यानं पुन्हा कॅप्टन होताच दाखवलं आपलं 'तेज'; BCCI ला करावा लागणार पुन्हा विचार

Suryakumar Yadav SMT 2026: या खेळीनंतर कामगिरीच्या कारणामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या सूर्याचा आता बीसीसीआयला पुन्हा विचार करावा लागण्याची शक्यता आहे.
Suryakumar Yadav SMT 2026
Suryakumar Yadav SMT 2026pudhari
Published on: 
Updated on: 

Suryakumar Yadav SMT 2026: भारताचा माजी टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली सईद मुश्ताक अली ट्रॉफी मधील नवी इनिंग सुरू केली आहे. पुन्हा मुंबईचा कर्णधार झालेल्या सूर्यकुमार यादवने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात २१ चेंडूत नाबाद ६० धावा करत एकप्रकारे निवडसमितीला एक संदेश दिला. या खेळीनंतर कामगिरीच्या कारणामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या सूर्याचा आता बीसीसीआयला पुन्हा विचार करावा लागण्याची शक्यता आहे. अर्थात यासाठी सूर्याला देखील आपल्या कामगिरीत सातत्य दाखवावं लागणार आहे.

Suryakumar Yadav SMT 2026
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या संघाची धुरा; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नेतृत्व

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर जाधवपूर विद्यापीठ कॅम्पस ग्राऊंड २ मध्ये हा सामना सुरू होता. मुंबईसमोर हैदराबादने १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमार यादव हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने आपल्या इंनिंगमध्ये ६ चौकार आणि ५ षटकार मारत मुंबईला १३.१ षटकातच विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने मुशीर खान सोबत तिसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ६५ धावांची भागीदारी रचली.

Suryakumar Yadav SMT 2026
Suryakumar Yadav Captaincy: सूर्यकुमार यादावच्या गळ्यात पुन्हा कर्णधार पदाची माळ; दोन स्पर्धांमध्ये करणार टीमचं नेतृत्व

युवा मुशीरने देखील अर्धशतकी खेळी केली. तो यंदाच्या हंगामात मुंबईकडून सलामीला फलंदाजी करत आहे. त्याने २४ चेंडूत ५१ धावा ठेकल्या. त्यात त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठकले. यापूर्वी मुशीरने हार्दिक तमोरेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली होती.

दरम्यान, शिवम दुबेने देखील आपला जवला दाखवत षटकार मारत मुंबईचा विजय शानदार केला. त्याने १४ व्या षटकात हा षटकार मारला. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५ चेंडूत नाबाद १३ धावा केल्या आहेत.

Suryakumar Yadav SMT 2026
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव विरोधात मोठं षड्यंत्र? टीम इंडियातून बाहेर, आता रणजीतही स्थान नाही; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.