Suryakumar Yadav Captaincy: सूर्यकुमार यादावच्या गळ्यात पुन्हा कर्णधार पदाची माळ; दोन स्पर्धांमध्ये करणार टीमचं नेतृत्व

काही दिवसांपूर्वीच रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाची निवड झाली होती. त्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली नव्हती
Suryakumar Yadav Captaincy
Suryakumar Yadav Captaincypudhari
Published on: 
Updated on: 

Surya Kumar Yadav Captaincy: भारतीय संघाला टी २० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधार पदासोबतच टीममधील आपले स्थान गमावे लागले होते. मात्र आता सूर्यकुमार यादवला मोठा दिलासा मिळाला असून सूर्यकुमार यादव आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे.

त्याला सईद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने हा निर्णय घेतला असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या मर्यादित षटकांच्या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे.

Suryakumar Yadav Captaincy
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव विरोधात मोठं षड्यंत्र? टीम इंडियातून बाहेर, आता रणजीतही स्थान नाही; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

रणजीतून वगळलं मात्र...

विशेष म्हणजे सूर्यकुमारला गेल्या महिन्यात मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर आता त्याला या वनडे आणि टी २० संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. त्याने आपण पूर्ण हंगाम देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र निवडसमितीने त्यााल रेड बॉल अर्थात कसोटी संघात सामील केलं नाही. त्यावेळी निवडसमितीने सूर्यकुमार यादवने पुरेशा प्रमाणात कसोटी क्रिकेट खेळलं नसल्याचं कारण दिलं होतं.

Suryakumar Yadav Captaincy
Mumbai Ranji Cricket Team | डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

१४ नोव्हेंबर पासून मोहीम सुरू

मुंबईचा सईद मुश्ताक अली ट्रॉफीमधील आपला पहिला सामना हा १४ नोव्हेंबर रोजी कोलकात्यात होणार आहे. एलीट ग्रुप डी मध्ये मुंबई सोबत हैदराबद, छत्तीसगड, गोवा, गुजरात, ओडिसा, उत्तराखंड आणि विदर्भ या संघांचा समावेश आहे. मुंबईचा पहिला सामना हा हैदराबादसोबत होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ निवड समितीने या हंगामात दोन मर्यादित षटकांच्या स्पर्धांसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ निवडीपूर्वी ७ आणि ९ नोव्हेंबर रोजी एक सराव सामना खेळला जाईल. ९ नोव्हेंबरला मुंबई संघाची निवड होईल. तर ११ नोव्हेंबरला संघ कोलकातासाठी रवाना होणार आहे.

Suryakumar Yadav Captaincy
Shubman Gill Ranji Trophy : ५ चेंडू, १ धाव आणि बोल्ड...! रणजी ट्रॉफीमध्ये शुभमन गिलचा 'फ्लॉप शो'

सूर्यकुमारसाठी हा सीजन असेल खास

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२६ चा टी २० वर्ल्डकप जिंकला होता. होत अनुभव आता मुंबई संघासोबत सूर्या शेअर करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीने ओळख निर्माण करणाऱ्या सूर्युकमारला आता मुंबईला सईद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

मुंबई संघाचा देशांतर्गत स्पर्धांमध्ये दबदबा राहिला आहे. रणजी ट्रॉफीसह त्यांनी अनेक स्पर्धांचे अनेकवेळा विजेतेपद पटकावलं आहे. अशात आता सूर्यकुमार यादव सारखा अनुभवी खेळाडू संघाचा कर्णधार झाला तर त्यांना त्याचा मोठा फायदा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.