ब्राझीलचा माजी स्टार रोनाल्डिन्हो कोलकात्यात

ब्राझीलचा माजी स्टार रोनाल्डिन्हो कोलकात्यात
Published on
Updated on

कोलकाता; वृत्तसंस्था :  ब्राझीलचा माजी स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो हा दोन दिवसांच्या कोलकाता भेटीसाठी भारतात आला आहे. सोमवारी त्याच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. रोनाल्डिन्होने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. त्याने येथील भूमी स्पोर्टस् क्लबला भेट दिली.

रोनाल्डिन्हो आपल्या शहरात आल्याची संधी साधून अनेक ठिकाणी त्याच्या हस्ते दुर्गापूजा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. रोनाल्डिन्होला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी तो जाईल तेथे फुटबॉलवेड्या कोलकातावासीयांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news