Sourav Ganguly : मी कर्णधार असतो तर सिराजला कधीच वगळले नसते; गंभीरच्या निर्णयावर गांगुली नेमकं काय म्हणाला?

युवा गोलंदाजांना घडवणे ठीक असले, तरी सामने जिंकण्यालाच सर्वोच्च प्राधान्य हवे
Sourav Ganguly on Mohammed Siraj Dropp
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली.Pudhari news
Published on: 
Updated on: 

Sourav Ganguly on Mohammed Siraj Dropping : टीम इंडियात सध्याच्या टप्प्यावर गोलंदाजीच्या फळीत नवे प्रयोग करणे योग्य नाही. मी संघाचा कर्णधार असतो, तर सिराजला संघातून कधीच वगळले नसते," अशा शब्‍दांमध्‍ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रशिक्षक गौतम गंभीरच्‍या निर्णयावर नाराजी व्‍यक्‍त केली.

सामने जिंकण्‍यालाच सर्वोच्‍च प्राधान्‍य हवे

'एबीपी इन्फोकॉम'मध्‍ये बोलताना गांगुलीने न्‍यूझीलंड विरुद्‍धच्‍या कसोटी मालिकेसाठीच्‍या संघ निवडीवर आश्चर्य व्यक्त केले. युवा गोलंदाजांना घडवणे ठीक असले, तरी सामने जिंकण्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे तो म्हणाला.

Sourav Ganguly on Mohammed Siraj Dropp
Sourav Ganguly : लॉर्ड्सवरील 'शर्टलेस' सेलिब्रेशनवर हक्क सांगत सौरव गांगुलींची हायकोर्टात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

सिराजला वगळल्‍याचा निर्णय माझ्‍यासाठी धक्‍कादायकच

संघाची निवड पाहण्यासाठी आणि काही षटकांचा खेळ बघण्यासाठी मी पहाटे ३ वाजता उठलो होतो. मात्र, अंतिम अकरामध्ये सिराजचे नाव नसल्याचे पाहून मला धक्का बसला. जसप्रीत बुमराहचे वय वाढत असल्याने भविष्याच्या दृष्टीने युवा गोलंदाजांना पारखून घेण्याचा गंभीरचा विचार असू शकतो. पण अशा परिस्थितीत सामने जिंकणे हीच प्रशिक्षकाची खरी कसोटी असते. सर्वांना संधी देण्यापेक्षा मी विजयाला अधिक महत्त्व दिले असते. मी कर्णधार असतो तर सिराजला कधीच बाहेर बसवले नसते. त्याला वगळण्यामागे गंभीरचे काहीतरी कारण असेलच, ते नेमके काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे."

Sourav Ganguly on Mohammed Siraj Dropp
Sourav Ganguly : सौरव गांगुलीला वाढदिवसाचे खास गिफ्ट, 'ICC हॉल ऑफ फेम'मध्ये एंट्री

'हा प्रयोग करण्याचा टप्पा नाही'

सिराजसारख्या अनुभवी गोलंदाजाऐवजी अंशुल कंबोजला संधी देण्याचा निर्णय गांगुलीला अजिबात रुचलेला नाही. कंबोज हा सिराजपेक्षा सरस गोलंदाज असल्याचा सल्ला दिला असता तर तो स्वीकारला असता का, या प्रश्नावर गांगुलीने ठाम नकार दिला. "नाही, अजिबात नाही! मी तो सल्ला कधीच मानला नसता. कंबोज या पातळीवर खेळण्यासाठी तयार आहे का, हे कदाचित गंभीरला तपासून पाहायचे असेल. पण इतक्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्रयोग करणे योग्य नाही," असे गांगुलीने स्पष्ट केले.

Sourav Ganguly on Mohammed Siraj Dropp
Sourav Ganguly : "मी एकदा मूर्ख बनू शकतो, दुसऱ्यांदा नाही": ग्रेग चॅपेल यांच्या IPL 'ऑफर'वर सौरव गांगुली काय म्‍हणाला होता?

गांगुलीने शेअर केला २००३ ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यातील अनुभव

यावेळी गांगुलीने २००३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील स्वतःच्या कर्णधारपदाचा अनुभव सांगितला. "कोणाच्या तरी सल्ल्यावरून संघ निवडणे मला कधीच मान्य नव्हते. २००३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अनिल कुंबळे आणि मुरली कार्तिक यांच्यापैकी कोणाला घ्यायचे, असा पेच होता. मला कार्तिकला खेळवण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण मला कुंबळेला वगळायचे नव्हते. एका निवडकर्त्याने तर ऑस्ट्रेलियात संघाची कामगिरी खराब झाल्यास तुलाच जबाबदार धरले जाईल, असा इशाराही दिला होता. तरीही मी कुंबळेला खेळवले आणि त्याने त्या मालिकेत सर्वाधिक ३० बळी घेतले," अशी आठवण गांगुलीने करून दिली.

प्रसिद्ध कृष्णाला संधी दिल्याने वादाला तोंड

सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्‍पर्धेत सिराजने ११ सामन्यांत ४३ बळी घेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. असे असूनही न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांत त्याला संधी मिळाली नाही.रविवारी क्राइस्टचर्चमधील हॅगले ओव्हल मैदानावर दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना हेल्मेटवर चेंडू आदळल्याने आकाश दीप उर्वरित सामन्यातून बाहेर पडला. सिराज संघात उपलब्ध असतानाही भारताने आकाश दीपचा 'कन्कशन सब्स्टिट्यूट' (डोक्याला दुखापत झाल्यास बदली खेळाडू) म्हणून प्रसिद्ध कृष्णाची निवड केली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Sourav Ganguly on Mohammed Siraj Dropp
Sourav Ganguly : 'कारण नसतानाच...' ; टीम इंडियातून शमीला वगळल्‍याने सौरव गांगुली भडकले

नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह

दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या भारताच्या निर्णयावरही गांगुलीने आश्चर्य व्यक्त केले. "मी नाणेफेक जिंकली असती, तर प्रथम फलंदाजी स्वीकारली असती. २००२ मध्ये हेडिंग्ले येथील हिरव्यागार खेळपट्टीवर आम्ही प्रथम फलंदाजी करत ६५० हून अधिक धावा केल्या होत्या आणि तो सामना एक डावाने जिंकला होता. अशी आव्हाने स्वीकारायला मला नेहमीच आवडते," असेही गांगुली म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.