Shreyas Iyer injury: श्रेयस अय्यरला मोठी दुखापत, थेट स्कॅनसाठी रुग्णालयात; आता कधी करणार मैदानात पुनरागमन?

IND vs AUS: भारतीय वनडे संघाचा उपकप्तान श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान मोठी दुखापत झाली आहे.
Shreyas Iyer injury:
Shreyas Iyer injury:file photo
Published on
Updated on

IND vs AUS Shreyas Iyer injury

नवी दिल्ली: भारतीय वनडे संघाचा उपकप्तान श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान मोठी दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या बरगड्यांना दुखापत झाली असून, यामुळे त्याला कमीतकमी तीन आठवड्यांसाठी मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यरला ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी उपलब्ध होणे अनिश्चित असेल.

Shreyas Iyer injury:
Australia women cricketers: गाडी अडवली, चुकीचा स्पर्श केला! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंशी तरुणाचे अश्लील वर्तन

नेमक काय घडलं?

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात हर्षित राणाने टाकलेल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ॲलेक्स कॅरीने उंच शॉट मारला. बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने वेगाने धाव घेत एक अप्रतिम झेल पकडला, परंतु झेल घेतल्यानंतर खाली पडताना त्याच्या डाव्या बरगड्यांना जोरदार झटका बसला. तो वेदनेमुळे लगेचच जमिनीवर बसून राहिला. यानंतर त्याला वैद्यकीय उपचारांसाठी मैदान सोडावे लागले आणि पुढील तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

Shreyas Iyer injury:
Rohit Virat Record: ODI मध्ये सचिन नंतर आता विराटच! रोहितनंही केले अनेक माईल स्टोन पार

तीन आठवड्यांची विश्रांती?

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले, “सामन्यादरम्यानच श्रेयसला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याच्या बरगड्यांना झटका बसल्याचे समजते. त्याला किमान तीन आठवड्यांसाठी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर स्कॅनमध्ये फ्रॅक्चर आढळले, तर त्याला अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते.”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील अनिश्चितता अय्यरच्या या दुखापतीमुळे रांची येथे ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "जर तीन आठवड्यांत तो फिट झाला, तरच तो खेळू शकेल. पण सध्या तरी त्याची उपलब्धता अनिश्चित आहे," असे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news