Rohit Virat Record: ODI मध्ये सचिन नंतर आता विराटच! रोहितनंही केले अनेक माईल स्टोन पार

Rohit Virat Record
Rohit Virat RecordPudhari Photo
Published on
Updated on

Rohit Sharma Virat Kohli Recordindia vs Australia 3rd odi:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना हा रोहित आणि विराट कोहलीच्या दृष्टीकोणातून खास ठरला. जरी भारतानं मालिका गमावली असली तरी रोहितच्या धडाकेबाज शतकी खेळीनं अन् विराटनं त्याला अर्धशतक करून दिलेल्या समर्थ साथीमुळं तिसरा वनडे सामना यादगार ठरला. या दोघांनी अजूनही आपल्यात बरंच क्रिकेट शिल्लक आहे हे दाखवून दिलं.

ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं २३७ धावांचं आव्हान भारतानं १ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. याचबरोबर या दोघांनी अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली. विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कुमार संगकाराला मागं टाकलं. आता या यादीत सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहलीचं नाव आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (Most Runs in ODIs)

  • सचिन तेंडुलकर,१८,४२६ धावा

  • विराट कोहली १४,२३५ धावा

  • कुमार संगकारा १४,२३४ धावा

  • रिकी पॉन्टिंग १३,७०४ धावा

  • सनथ जयसूर्या १३,४३० धावा

याचबरोबर रोहित शर्मानं देखील अनेक माईल स्टोन पार केले आहेत. पाहुयात या दोघांनी कोणते माईल स्टोन पादाक्रांत केले आहेत.

रोहित शर्माने (Rohit Sharma) केले खास माईलस्टोन पार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० वे शतक (50th century in all International cricket):

  • टेस्ट (कसोटी) मध्ये - १२

  • एकदिवसीय (ODI) मध्ये - ३३

  • टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) मध्ये - ०५

  • तो तिन्ही फॉरमॅटमध्ये पाच किंवा अधिक शतके करणारा एकमेव फलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियात पाहुणा फलंदाज म्हणून सर्वाधिक एकदिवसीय शतके (Most ODI 100s by a visiting batter in Australia):

  • रोहित शर्मा - ६ शतके (३३ डाव)

  • विराट कोहली - ५ शतके (३२ डाव)

  • कुमार संगकारा - ५ शतके (४९ डाव)

सर्वाधिक १००+ धावांच्या भागीदारी (Most 100+ Partnerships in ODIs)

  • तेंडुलकर - गांगुली,२६,१७६

  • दिलशान - संगकारा,२०,१०८

  • रोहित - कोहली,१९ *,१०१

  • रोहित - शिखर,१८,११७

सर्वाधिक १००+ धावांच्या भागीदारीत सहभाग (Involved in most 100+ Partnerships - ODI)

  • सचिन तेंडुलकर,९९

  • विराट कोहली,८२ *

  • रिकी पॉन्टिंग,७२

  • रोहित शर्मा,६८ *

  • कुमार संगकारा,६७

एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके (Most ODI 100s against an opposition)

  • विराट कोहली शतके- १० विरूद्ध - श्रीलंका

  • विराट कोहली शतके- ९ शतके- विरूद्ध - वेस्ट इंडिज

  • सचिन तेंडुलकर शतके- ९, विरूद्ध - ऑस्ट्रेलिया

  • रोहित शर्मा शतके- ९, विरूद्ध - ऑस्ट्रेलिया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news