Shreyas Iyer Record: 'शतकवीर' कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा माईलस्टोन... दिग्गजांना मागं टाकलं मात्र सिकंदर अजूनही आवाक्याबाहेर

श्रेयस अय्यर हा हॅरी ब्रुक्ससोबत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनीही ४२ चेंडूत शतक ठोकलं होतं.
Shreyas Iyer Record
Shreyas Iyer Recordpudhari
Published on: 
Updated on: 

Shreyas Iyer Record: वेस्ट इंडीज विरूद्धच्या ५ टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा ८ विकेट्स राखून पराभव केला. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरचा सिंहाचा वाटा होता. त्याने ४३ चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. तो सामनावीर देखील ठरला. श्रेयस अय्यरने या खेळीदरम्यान दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम देखील मोडला. आता कर्णधार म्हणून टी २० सामन्यात शतकी खेळी करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

Shreyas Iyer Record
India Squad vs West Indies: विंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! रोहित-विराट, वैभव सूर्यवंशी संघात; हार्दिक-पंतला डच्चू

श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर

टी २० च्या फुल मेंबर्स टीम्सच्या बाबतीत विचार करायचं झालं तर सर्वात कमी चेंडू शतक ठोकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत श्रेयस अय्यर हा हॅरी ब्रुक्ससोबत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनीही ४२ चेंडूत शतक ठोकलं होतं. श्रेयस अय्यरने फाफ ड्युप्लेसिसला या यादीत मागे टाकले. कर्णधार असताना ड्युप्लेसिसने ४६ चेंडूत शतक ठोकलं होतं. मात्र या यादीत पहिल्या स्थानावर सिकंदर रजा असून दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे.

Shreyas Iyer Record
India Vs West Indies|भारताच्या विजयावर पाकिस्‍तानच्‍या माजी क्रिकेटपटूचा जळफळाट; हेटमायरच्या विकेटवरून केलं अजब विधान

दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये फुल-मेंबर संघांच्या कर्णधारांनी झळकावलेली सर्वात जलद शतके आणि भारतीय फलंदाजांचे विक्रम खालीलप्रमाणे आहेत

सिकंदर रजा (झिम्बाब्वे): ३३ चेंडूंमध्ये शतक (विरुद्ध GAM, नैरोबी, २०२४)

रोहित शर्मा (भारत): ३५ चेंडूंमध्ये शतक (विरुद्ध श्रीलंका, इंदौर, २०१७)

हॅरी ब्रूक (इंग्लंड): ४२ चेंडूंमध्ये शतक (विरुद्ध श्रीलंका, साउथेम्टन, २०२६)

श्रेयस अय्यर (भारत): ४२ चेंडूंमध्ये शतक (विरुद्ध वेस्ट इंडीज, लखनऊ, २०२६)

फॉफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका): ४६ चेंडूंमध्ये शतक (विरुद्ध वेस्ट इंडीज, जोहान्सबर्ग, २०१५)

Shreyas Iyer Record
Shreyas Iyer : कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने एम.एस. धोनीला मागे टाकले; सलग सर्वाधिक T-20 आंतरराष्ट्रीय विजयाची नोंद

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतासाठी शतके झळकावणारे फलंदाज

सूर्यकुमार यादव: ११७ रन (विरुद्ध इंग्लंड, ट्रेंट ब्रिज, २०२२)

के. एल. राहुल: ११०* रन (विरुद्ध वेस्ट इंडीज, लॉडरहिल, २०१६)

श्रेयस अय्यर: १०२* रन (विरुद्ध वेस्ट इंडीज, लखनऊ, २०२६)

के. एल. राहुल: १०१* रन (विरुद्ध इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड, २०१८)

रोहित शर्मा: १००* रन (विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्टल, २०१८)

Shreyas Iyer Record
Shreyas Iyer Video: श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; वैभवच्या पदार्पणावरून नवा वाद, व्हिडिओ व्हायरल

याशिवाय, इशान किशनने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात नाबाद ३७ धावा करत विराट कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून एका कॅलेंडर वर्षात टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news