Shafali Verma 200 : शेफालीचा महापराक्रम! ठोकले सर्वात वेगवान कसोटी द्विशतक

भारतासाठी द्विशतक झळकावणारी दुसरी खेळाडू
Shafali Verma Double Century
शेफाली वर्माने द. आफ्रिकेविरुद्ध सर्वात वेगवान द्विशतक झ्ळकावले Photo Credit : @BCCIWomen

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shafali Verma Double Century : भारतीय महिला संघाची धदाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माने नवा इतिहास रचला आहे. तिने महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तिने चौकार-षटकारांची आतषबाजी करत हा महापराक्रम नोंदवला.

भारतीय महिला खेळाडूंचा धमाका

Summary
  • शेफाली वर्माचे द. आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज कसोटी द्विशतक

  • चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी

  • शेफाली-स्मृतीची पहिल्या विकेटसाठी 292 धावांची विश्वविक्रमी भागिदारी

शेफालीची खेळी कशी झाली?

शफालीने या सामन्यात 194 चेंडूंचा सामना करत तिचे द्विशतक पूर्ण केले. 197 चेंडूत 205 धावा करून ती बाद झाली. तिच्या बॅटमधून 43 चौकार आणि 8 षटकार आले. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 104.06 राहिला. तिने स्मृती मानधनासोबत पहिल्या विकेटसाठी 312 चेंडूत 292 धावांची भागीदारी रचली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. स्मृती बाद झाल्यानंतर शेफालीने शुभा सतीशसह 33 आणि जेमिमाह रॉड्रिग्जसोबत 86 धावांची भागिदारी केली.

Shafali Verma Double Century
द. आफ्रिकेविरुद्ध स्मृती-शेफालीची 292 धावांची विश्वविक्रमी सलामी!

सर्वात वेगवान द्विशतक

महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ॲनाबेल सदरलँडच्या नावावर होता. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाच्या या खेळाडूने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 248 चेंडूंचा सामना करत द्विशतक झळकावले होते. शेफालीने तिचा विक्रम मोडीत काढत 194 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाची कॅरेन रोल्टन (301 चेंडूत 200 धावा) या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

भारतासाठी द्विशतक झळकावणारी दुसरी खेळाडू

शेफाली ही कसोटीत द्विशतक झळकावणारी 10वी महिला खेळाडू ठरली आहे. तर भारताची दुसरी कसोटी द्विशतकवीर बनली आहे. तिच्या आधी भारताची माजी कर्णधार मिताली राजने 2002 मध्ये इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध 214 धावांची खेळी खेळली साकारली होती. तिने 407 चेंडूंचा सामना करताना 19 चौकार मारले होते. या दोन खेळाडूंशिवाय कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावता आलेले नाही.

शेफालीची कसोटी कारकीर्द कशी राहिली?

शेफालीने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. तिने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने 60.33 च्या सरासरीने 543 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिच्या बॅटमधून 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकली आहेत. तिची सर्वोत्तम धावसंख्या 205 आहे. द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तिची सर्वोत्तम धावसंख्या 96 धावा होती. जी तिने इंग्लंडविरुद्ध खेळली होती.

Shafali Verma Double Century
फायनलमध्ये धडक मारताच रोहित भावूक

महिला क्रिकेटच्या 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच

शेफाली वर्माने स्मृती मानधनासोबत पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी केली. महिला क्रिकेटच्या 90 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. शेफाली वर्माचे हे कसोटी क्रिकेटमधील ठरले आणि तिने पुढे आपल्या पहिल्या शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले. अशा प्रकारे तिच्या नावावर आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली गेली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news