Team India : संजू सॅमसन की ईशान किशन? टीम इंडियाच्या 'ओपनिंग'साठी जोरदार रस्सीखेच; कोणाचं पारडं जड

Sanju Samson vs Ishan Kishan : सध्या एकच चर्चा रंगली आहे. ‘अभिषेक शर्मासोबत सलामीला कोण येणार?’
Team India : संजू सॅमसन की ईशान किशन? टीम इंडियाच्या 'ओपनिंग'साठी जोरदार रस्सीखेच; कोणाचं पारडं जड
Published on
Updated on

Sanju Samson vs Ishan Kishan Intense Battle for Team India’s Opening Slot

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे बिगुल आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. या भव्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून, यासाठी बीसीसीआयने (BCCI) आपला संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, वर्ल्ड कपसाठी जी कोर टीम असेल, तीच या मालिकेतही खेळताना दिसणार आहे. मात्र, सध्या चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ‘अभिषेक शर्मासोबत सलामीला कोण येणार?’

सलामीसाठी तीन शिलेदार मैदानात

भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या तयारीला वेग दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सलामीच्या जागेसाठी सध्या संघात तीन प्रबळ दावेदार आहेत. यात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन यांचा समावेश आहे.

या तिघांपैकी अभिषेक शर्माची जागा जवळपास पक्की मानली जात आहे, पण त्याचा जोडीदार कोण असेल? हा खरा पेच निवड समितीसमोर आहे.

Team India : संजू सॅमसन की ईशान किशन? टीम इंडियाच्या 'ओपनिंग'साठी जोरदार रस्सीखेच; कोणाचं पारडं जड
Vijay Hazare Trophy : ‘कोहली’च्या सामन्यासाठी ‘चाहत्यांचा’ पत्ता कट! बेंगळुरू संतापाची लाट, रिकाम्या स्टेडियममध्ये रंगणार दिल्लीची लढत

ईशान किशनचे 'धडाकेबाज' पुनरागमन, पण...

बऱ्याच काळानंतर ईशान किशनने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याने झंझावाती शतक ठोकून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. पण फॉर्ममध्ये असूनही, न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला लगेच संधी मिळण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येत आहे.

Team India : संजू सॅमसन की ईशान किशन? टीम इंडियाच्या 'ओपनिंग'साठी जोरदार रस्सीखेच; कोणाचं पारडं जड
ICC Rankings : स्मृती मानधनाला मोठा फटका, दीप्ती शर्माची अव्वल स्थानी झेप

संजू-अभिषेक जोडीला प्राधान्य का?

मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन सध्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीलाच सलामीसाठी पसंती देऊ शकते. याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनी गेल्या काही मालिकांमध्ये सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. ईशान किशनला संधी मिळण्यासाठी संजू किंवा अभिषेक यांच्यापैकी कोणा एकाचा फॉर्म खराब होणे किंवा दुखापत होणे, अशीच परिस्थिती निर्माण व्हावी लागेल. तोपर्यंत ईशानला बाकावरच बसावे लागण्याची शक्यता अधिक आहे.

Team India : संजू सॅमसन की ईशान किशन? टीम इंडियाच्या 'ओपनिंग'साठी जोरदार रस्सीखेच; कोणाचं पारडं जड
Cricket Record : अविश्वसनीय... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच असं घडलं..! गोलंदाजाने एकाच षटकात केली अचाट कामगिरी

टी-२०ची आकडेवारी काय सांगते?

सलामीच्या शर्यतीत असलेल्या या तीन खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली, तर कोणाचं पारडं जड आहे हे स्पष्ट होतं.

  • अभिषेक शर्मा : ३३ सामने : १११५ धावा : २ शतके : ६ अर्धशतके : १८८.०० स्ट्राईक रेट

  • संजू सॅमसन : ५२ सामने : १०३२ धावा : ३ शतके : ३ अर्धशतके : १४८.०० स्ट्राईक रेट

  • ईशान किशन : ३२ सामने : ७९६ धावा : ६ अर्धशतके : १२४.०० स्ट्राईक रेट

अभिषेक शर्माचा १८८ चा स्ट्राईक रेट त्याला टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात घातक ठरवतो. तर संजू सॅमसनने सर्वाधिक ३ शतके झळकावली आहेत. ईशान किशनच्या खात्यात ६ अर्धशतके असली तरी स्ट्राईक रेट आणि शतकांच्या बाबतीत तो सध्या मागे दिसतोय.

Team India : संजू सॅमसन की ईशान किशन? टीम इंडियाच्या 'ओपनिंग'साठी जोरदार रस्सीखेच; कोणाचं पारडं जड
WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धमाका! जेमिमा रॉड्रिग्जकडे संघाचे नेत्तृत्त्‍व

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका २०२६ च्या वर्ल्ड कपची पायाभरणी मानली जात आहे. ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या संजू सॅमसनचा फॉर्म आणि अभिषेक शर्माचा आक्रमक अंदाज यालाच प्राधान्य मिळताना दिसत आहे. आता कर्णधार आणि प्रशिक्षक प्रत्यक्ष मैदानात कोणाला उतरवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news