Sania Mirza: 'माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नाही कारण...'; सानिया मिर्झाने दुसऱ्या लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच सांगितलं

टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Sania Mirza
Sania MirzaFile Photo
Published on: 
Updated on: 

Sania Mirza

नवी दिल्ली: टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नाही आणि भविष्यातही कोणीतरी असेल की नाही, हे सांगता येत नाही, असे स्पष्ट विधान सानियाने केले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे दुसरे लग्न आणि नव्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या 'डबल डेट' या टॉक शोमध्ये सानिया मिर्झा आणि फराह खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी सानियाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. अलीकडे कोणी तिला कॉफी डेटसाठी विचारले आहे का, अशी विचारणा सूत्रसंचालकांनी केली. त्यावर सानियाने आपल्या पुरुष मित्रांकडून अनेकदा फिरायला जाण्याचे आमंत्रण मिळत असल्याचे सांगितले. मात्र, कोणाकडूनही प्रेमसंबंधाबाबत विशेष बोललं नसल्याचे तिने स्पष्ट केले.

Sania Mirza
Anirudh Ravichander-Kavya Maran: कोण आहे अनिरुद्ध रविचंदर? ज्याच्याशी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने बांधली लग्नगाठ

यानंतर अंगद बेदीने सानियाला एखाद्या कोणासोबत सुंदर क्षण घालवण्याची इच्छा होते का, असा प्रश्न विचारला. त्यावर सानियाने, 'माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नाही आणि भविष्यात कोणी असेल की नाही, हेही मला माहीत नाही,' असे उत्तर दिले. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सानियाच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत आणि नव्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही काळासाठी तरी पूर्णविराम मिळाला आहे.

सानिया मिर्झाने २०१० मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार शोएब मलिक याच्याशी विवाह केला होता. २०१८ मध्ये या दाम्पत्याला इझहान हा मुलगा झाला. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. २०२४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सानिया एकटीच मुलाचा सांभाळ करत आहे. दुसरीकडे, शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी विवाह केला आहे. दरम्यान, सानियाने २०२३ मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर ती भारतीय टेनिस स्पर्धांच्या प्रसारणादरम्यान तज्ज्ञ विश्लेषक आणि समालोचक म्हणून दिसते.

Sania Mirza
Aryaveer Sehwag viral video : "नेहमी असा विचार करा..." : आर्यवीर सेहवागला विराट कोहलीने दिलेला सल्ल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.