Sachin Tendulkar viral video | भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते..! सचिन तेंडुलकरच्या 'त्या' एका कृतीने जिंकली कोट्यवधींची मने!

Sachin Tendulkar viral video | आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या सत्काराचा व्हिडिओ व्हायरल
Sachin Tendulkar viral video |  भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते..! सचिन तेंडुलकरच्या 'त्या' एका कृतीने जिंकली कोट्यवधींची मने!
Published on
Updated on

Sachin Tendulkar viral video

व्यक्ती यशस्वी होते. हेच यश त्याच्यामध्ये अहंकाराचा भावही जन्माला घालते, असे मानले जाते. त्यामुळेच यश आणि नम्रपणा अशी काही मोजकीच उदाहरणे पाहायला मिळतात. यामध्ये अग्रस्थानी नाव येते ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर! आपल्या खेळाने जगभरातील कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकणारा खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहेच. त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून त्याचे नम्र व्यक्तिमत्त्व सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. नुकताच आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमात सचिनमधील संस्कारांची प्रचिती पुन्हा एकदा आली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सोशल मीडियावरही त्याच्या नम्रपणाचे कौतुक होत आहे.

आदराने नतमस्तक होऊन केला मूर्तीचा स्वीकार

विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला विशेष पाहुणा म्हणून सचिन उपस्थित होता. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सचिनला भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती भेट म्हणून दिली. मूर्ती स्वीकारण्यापूर्वी त्याने आपले बूट (शूज) काढले आणि अत्यंत आदराने नतमस्तक होऊन मूर्तीचा स्वीकार केला. धार्मिक प्रसंगी आदर व्यक्त करण्याच्या परंपरेचे पालन सचिनने यावेळी केले. सचिनच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्याच्या जमिनीवर असलेल्या स्वभावाचे आणि शिष्टाचाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विक्रमादित्य सचिन...

सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी जगभरात 'क्रिकेटचा देव' मानले जाते. १९८९ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या 'मास्टर ब्लास्टर'ची कारकीर्द २४ वर्षे दिमाखात गाजली. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आणि खेळाचा सर्वात मोठा आयकॉन म्हणून तो निवृत्त झाला. कसोटी आणि एकदिवसीय (ODI) अशा दोन्ही प्रकारांत सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar viral video |  भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते..! सचिन तेंडुलकरच्या 'त्या' एका कृतीने जिंकली कोट्यवधींची मने!
Arjun Birthday Wish Sachin: गडबडीत आला, हॅपी बर्थडे म्हणाला अन् दिला नकार... ९ सेकंदाच्या Video द्वारे अर्जुनने दिल्या शुभेच्छा

ब्रायन लाराकडून खास शुभेच्छा

दरम्यान, २४ एप्रिल रोजी सचिनने आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटले की, आज मी अशा व्यक्तीसाठी बॅट उंचावत आहे ज्याने केवळ खेळ खेळला नाही, तर या खेळाचे स्वरूप बदलले. वाढदिवसाच्या शुभेच्छा, सचिन तेंडुलकर!

Sachin Tendulkar viral video |  भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते..! सचिन तेंडुलकरच्या 'त्या' एका कृतीने जिंकली कोट्यवधींची मने!
Watch: पायाने बॉलिंग, खांद्याने बॅटिंग… दोन्ही हात नसतानाही टाकतोय लेग स्पिन; सचिन तेंडुलकरही झाला थक्क

तुझ्यामुळे क्रिकेट हा खेळ अधिक समृद्ध झाला

"विक्रम एक गोष्ट सांगतील, पण तुझ्यासोबत खेळलेल्या आम्हा सर्वांना खरी गोष्ट माहित आहे. ती म्हणजे तुझी शिस्त, तुझी नम्रता आणि दररोज अधिक चांगले होण्याची तुझी भूक. तुझा दिवस आनंदाने साजरा कर, मित्रा. तुझ्यामुळे क्रिकेट हा खेळ अधिक समृद्ध झाला आहे," असेही लाराने आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news