Arjun Birthday Wish Sachin: गडबडीत आला, हॅपी बर्थडे म्हणाला अन् दिला नकार... ९ सेकंदाच्या Video द्वारे अर्जुनने दिल्या शुभेच्छा

Arjun Birthday Wish Sachin
Arjun Birthday Wish Sachinpudhari
Published on
Updated on

Arjun Birthday Wish Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा व्हिडिओ लखनौ सुपर जायंट्सने देखील पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्सने सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि लखनौ सुपर जायंट्सकडून या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत अर्जुन तेंडुलकरने अत्यंत विनोद बुद्धीने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Arjun Birthday Wish Sachin
Cricket History : जेव्हा सिद्धूंच्या दुखापतीने बदलले भारतीय क्रिकेटचे नशीब; वाचा, सचिन कसा बनला 'वर्ल्ड क्लास' ओपनर!(VIDEO)

लखनौने पोस्ट केला व्हिडिओ

लखनौने हा हलका फुलका व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अर्जुन तेंडुलकर कॅमेऱ्याकडे घाई गडबडीत येतो आणि आपल्या वडिलांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देतो. अर्जुन कॅमेरा शाय मुलगा असल्याचं या व्हिडिओत देखील दिसतं. मात्र समोर ठेवलेला केक पाहून अर्जुनला एक जोक क्रॅक करण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही.

अर्जुन तेंडुलकर म्हणाला, 'हॅपी बर्थडे मात्र मी हा केक काही खारणार नाही. मी साखरेचे पदार्थ सहसा खात नाही. मी लवकरच तुम्हा भेटतो.'

Arjun Birthday Wish Sachin
Sachin Tendulkar Ban: ‘क्रिकेटच्या देवावर’ झाला होता फसवणुकीचा आरोप; सचिनवर बंदी का घालण्यात आली होती?

अर्जुनचा शिस्तबद्धपणा

अर्जुनच्या या व्हिडिओमुळे अर्जुन तेंडुलकर हा आपल्या हेल्थबाबत आणि क्रिकेट खेळतानाच्या आपल्या रूटीनबाबत किती गंभीर आहे याची जाणीव होते. अर्जुन देखील आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिकेट खेळताना अत्यंत शिस्तबंद्ध वागतो याचं हे उदाहरण आहे.

सचिन तेंडुलकरच्या नावावर आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४,३५७ धावांचा अभूतपूर्व विक्रम आहे. कसोटी आणि वनडे अशा दोन्ही प्रकारांत सर्वाधिक शतके ठोकण्याचा मानही त्यालाच जातो, जे त्याच्या सातत्यपूर्ण खेळाचे आणि प्रदीर्घ कारकिर्दीचे प्रतीक आहे.

Arjun Birthday Wish Sachin
Yuvraj Singh|"तुझ्‍याकडे फक्‍त ३ ते ६ महिन्‍यांचे आयुष्‍य आहे" : युवराज सिंगने शेअर केला आयुष्‍यातील अत्‍यंत कठीण काळ

सचिनची कामगिरी

केवळ कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर त्याने विक्रमी २०० सामने खेळले असून त्यात १५,९२१ धावा आणि ५१ शतके झळकावली आहेत. हे आकडे आजही क्रिकेट विश्वातील एक मापदंड मानले जातात.

वनडे क्रिकेटमधील त्याचे वर्चस्वही तितकेच विलक्षण होते. विशेषतः १९९८ चे वर्ष, ज्यामध्ये त्याने १,८९४ धावा आणि नऊ शतके ठोकली होती; आजही एका कॅलेंडर वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.

तसेच, क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सर्वाधिक अर्धशतके, सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. निवृत्तीनंतर अनेक वर्षांनीही मैदानावर आणि मैदानाबाहेर सचिनचा प्रभाव कायम आहे आणि संपूर्ण क्रिकेट जगत आजही त्याच्या महानतेचा गौरव करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news