Rumesh Tharanga Javelin Throw : नीरज चोप्राचा 'तो' रेकॉर्ड मोडला! श्रीलंकेच्या रुमेश थारंगाचा 'थ्रो' ठरला विक्रमी

रोम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत भारताच्‍या सचिन यादवची निराशाजनक कामगिरी
Rumesh Tharanga Javelin Throw
श्रीलंकेच्या रुमेश थारंगा पाथिरागे याने येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. Pudhari
Published on
Updated on

Rumesh Tharanga Javelin Throw : श्रीलंकेच्या रुमेश थारंगा पाथिरागे याने गुरुवारी (दि. ४) रोम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत ९२.६२ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे तो आशियातील दुसरा सर्वोत्तम थ्रो नोंदवणारा भालाफेकपटू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने चायनीज तैपेईच्या चाओ-त्सुन चेंग आणि भारताच्या नीरज चोप्रा या दोघांनाही मागे टाकले आहे.

सचिन यादवची निराशाजनक कामगिरी

एकीकडे पाथिरागेने सर्व हेडलाईन्स आपल्या नावावर केल्या असताना, दुसरीकडे भारताच्या सचिन यादवची डायमंड लीगमधील सुरुवात मात्र निराशाजनक झाली. १० खेळाडूंच्या या स्पर्धेत ७९.१८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सचिन आठव्या स्थानावर राहिला. २६ वर्षीय सचिनची ही कामगिरी त्याच्या ८६.२७ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खूपच कमी होती, जी त्याने २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चौथे स्थान मिळवताना नोंदवली होती. एप्रिलमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या 'इंडियन ॲथलेटिक्स सिरीज ३' मध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ८१.९५ मीटर होती. या स्‍पर्धेत तो दुसर्‍या स्‍थानी होता.

Rumesh Tharanga Javelin Throw
FIFA World Cup : भांडी घासणारा.. पोस्टमन अन् नवख्यांची टोळी; 'या' 6 सामन्यांनी रडवलं होतं फुटबॉलच्या महासत्तांना!

थारंगाची ऐतिहासिक झेप

पाथिरागेने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. त्याने दुसऱ्या फेरीत ९२.६२ मीटरचा थ्रो केला. या थ्रोमुळे त्याने चेंगच्या ९१.३६ मीटर आणि नीरज चोप्राच्या ९०.२३ मीटरच्या विक्रमाला मागे टाकत आशियाई इतिहासातील दुसरा सर्वोत्तम खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला.तसेच ९० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा तो आशियातील चौथा आणि जगातील २८ वा खेळाडू ठरला आहे.

Rumesh Tharanga Javelin Throw
IND vs AFG Test : बुमराहनंतर सिराजही OUT! अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा कोण सांभळणार?

देशांतर्गत स्‍पर्धेतही थारंग अव्‍वल स्‍थानी

मार्च महिन्यातील एका देशांतर्गत स्पर्धेत ८९.३७ मीटर थ्रो करून या हंगामात जगात अव्वल स्थानी होता. आशियातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीच्या यादीत त्याचा हा थ्रो आता फक्त अर्शद नदीमच्या पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमधील ९२.९७ मीटरच्या सुवर्णपदक विजेत्या विक्रमाच्या मागे आहे.२०२६ चा हा हंगाम पाथिरागेसाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे. ३१ मे रोजी झालेल्या रबात डायमंड लीगमध्ये त्याने ८५.o७ मीटरसह दुसरे स्थान पटकावले होते. त्यापूर्वी त्‍याने नैरोबीतील 'किप केनो क्लासिक' स्पर्धा ८९.२८ मीटर थ्रोसह जिंकली होती.सचिन यादवसाठी, २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चौथे स्थान मिळवल्यानंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

Rumesh Tharanga Javelin Throw
Paki vs Ban| "आता काय ICC ट्रॉफी चोरणार का?" : बांगलादेशने लोळवल्‍यानंतर माजी क्रिकेटपटूने नक्‍वींसह पाकिस्तान संघाला झापले

दोन वेळच्‍या जागतिक विजेता पीटर्स दुसर्‍या स्‍थानी

दोन वेळचा जागतिक विजेता आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अँडरसन पीटर्स ८३.९१ मीटरसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन ८३.८९ मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला. माजी ऑलिम्पिक विजेता केशॉर्न वॉलकोट ८३.४५ मीटरसह चौथ्या क्रमांकावर राहिला.

Rumesh Tharanga Javelin Throw
Cricket Record: २५४ वर्षात कोणालाच जमलं नाही! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने केला भन्नाट विश्वविक्रम; व्हिडिओ पाहाच!

नीरज चोप्रा रोममधील स्‍पर्धेत का सहभागी झाला नाही ?

तुर्कीयेमधील सरावानंतर सध्या स्वित्झर्लंडमधील बिएन येथे सराव करत असलेला भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याने रोममधील या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तो आपल्या या हंगामाची सुरुवात कधी करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुरुषांच्या भालाफेकचा समावेश असलेली पुढील डायमंड लीग स्पर्धा १९ जून रोजी दोहा येथे होणार आहे. ही स्पर्धा मूळत: ८ मे रोजी होणार होती, परंतु पश्चिम आशियातील संघर्षामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news