Rohit Sharma : 12 हजार धावा, 260 षटकार... अजूनही थांबायचे नाहीय!

रोहितने ‘IPL’मध्ये सर्वाधिक षटकार खेचणार्‍या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांमध्ये केरॉन पोलार्डला पिछाडीवर टाकले.
rohit sharma record
Published on
Updated on

Rohit Sharma scored 12000 runs in T20 career

मुंबई : टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार व त्याहून अधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने स्थान निश्चित केले असून, याचवेळी ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक षटकार खेचणार्‍या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांमध्ये केरॉन पोलार्डला पिछाडीवर टाकले आहे. सध्या त्याच्या खात्यावर 260 षटकार आहेत. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सध्या उत्तम बहरात परतलेल्या रोहित शर्माने बुधवारी या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावत मुंबई इंडियन्सला धडाकेबाज विजय मिळवून दिला.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवून देत असताना रोहितने 46 चेंडूंमध्ये 70 धावा करत 8 चौकार, 3 षटकार ठोकले. अगदी रियान रिकेल्टन लवकर बाद झाला असला, तरी रोहितने आपली एकाग्रता ढळू दिली नाही. या सामन्यात आपल्या खेळीदरम्यान 12 धावा पूर्ण करत रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा गाठला. त्याने हा पराक्रम आपल्या 456 व्या टी-20 सामन्यात केला. 12 हजार व त्याहून अधिक धावा करणार्‍या फ लंदाजांच्या यादीत तूर्तास ख्रिस गेल आघाडीवर असून, त्याने 463 सामन्यांतून 14,562 धावा केल्या आहेत. कोहलीने 407 सामन्यांत 13,208 धावा केल्या आहेत. याशिवाय, या सामन्यातील 3 षटकारांमुळे रोहितने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार मारणार्‍या खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थान पटकावले. त्याचे एकूण 260 षटकार झाले असून, पोलार्डचे 258 षटकार आहेत.

rohit sharma record
Rohit Sharma Record : ‘हिटमॅन’ रोहितच्या टी-20मध्ये 8000 ‘विजयी’ धावा! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

12 हजारपैकी 8 हजार ‘विजयी’ धावा!

हिटमॅन रोहित शर्माने आपल्या टी-20 कारकिर्दीत विजयी सामन्यांमध्ये 8 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या रोहितच्या खात्यावर जिंकलेल्या सामन्यांतील धावा 8,056 इतक्या आहेत. अशी कामगिरी आणखी कोणत्याही फलंदाजाला करता आलेल्या नाहीत. यंदाच्या हंगामात रोहितने सलग 2 अर्धशतके झळकवली असून, यापूर्वी त्याने अशी कामगिरी 2016 मध्ये केली होती.

rohit sharma record
वानखेडेवर माझ्या नावाचे स्टँड ही सन्मानाची गोष्ट : रोहित शर्मा

टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार व त्याहून अधिक धावा करणारे खेळाडू

  • ख्रिस गेल : 463 सामने : 14,562 धावा

  • अ‍ॅलेक्स हेल्स 494 सामने : 13,610 धावा

  • शोएब मलिक : 557 सामने : 13,571 धावा

  • किरोन पोलार्ड : 695 सामने : 13,537 धावा

  • विराट कोहली : 407 सामने : 13,208 धावा

  • डेविड वॉर्नर : 404 सामने : 13,019 धावा

  • जोस बटलर : 442 सामने : 12,469 धावा

  • रोहित शर्मा : 456 सामने : 12,058 धावा

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार

  • 260 षटकार : रोहित शर्मा

  • 258 षटकार : किरोन पोलार्ड

  • 127 षटकार : सूर्यकुमार यादव

  • 115 षटकार : हार्दिक पंड्या

  • 106 षटकार : इशान किशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news