Rohit Sharma: 'आता मी काय करू?' सेल्फी घेतानाच महिला चाहतीचा फोन बंद पडला अन् रोहित शर्मा वैतागला! पाहा Video

IPL 2026 Rohit Sharma Mumbai Indians: भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmafile photo
Published on
Updated on

IPL 2026 Rohit Sharma Mumbai Indians

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिला चाहतीसोबत सेल्फी घेताना घडलेल्या एका विचित्र प्रसंगामुळे रोहित चांगलाच वैतागलेला पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या पुढील सामन्यासाठी बसने रवाना होत असताना ही घटना घडली. रोहित शर्मा बसकडे जात असताना एक महिला चाहती उत्साहाने त्याच्या जवळ आली आणि सेल्फी घेण्याचा आग्रह धरला. रोहितनेही सेल्फीसाठी पोझ दिली. मात्र, नेमक्या त्याच क्षणी त्या चाहतीचा फोन बंद झाला. "माझा फोन बंद झालाय," असे म्हणत ती चाहती गोंधळली आणि आजूबाजूच्या लोकांकडे दुसऱ्या फोनची मागणी करू लागली.

Rohit Sharma
NADA Notice: यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा अडचणीत; NADA कडून नोटीस; खेळाडूंवर बंदी घातली जाणार?

रोहित आधीच बसकडे जाण्याच्या घाईत होता, त्यात हा गोंधळ पाहून तो काहीसा वैतागला. आपल्या मिश्किल शैलीत त्याने त्या चाहतीला विचारले, "मग आता मी काय करू?" रोहितची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अर्थात, इतका गोंधळ होऊनही रोहितने संयम राखला आणि अखेर त्या चाहतीला तिचा सेल्फी मिळालाच.

हा व्हायरल व्हिडिओ हास्याचा विषय ठरला असला, तरी रोहित अलीकडे त्यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या कारणांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ते म्हणजे IPL २०२६ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याने पुन्हा लय पकडली आहे. वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने मॅच-विनिंग खेळी केली. त्यानंतर भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याचे कौतुक केले होते.

Rohit Sharma
World Record: 6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... KKRच्या पठ्याने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला; कोण आहे हा खेळाडू?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news