Rohit Sharma : रोहित शर्माचं ट्रान्सफॉर्मेशन... २०११ च्या वर्ल्डकपशी आहे कनेक्शन

Rohit Sharma
Rohit Sharma Pudhari Photo
Published on
Updated on

Rohit Sharma Fitness Transformation :

भारताला टी २० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्मा आता वनडेमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळणार आहे. शुभमन गिल भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटी क्रिकेट आणि टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आणि रोहितचा फोकस हा आगामी वनडे वर्ल्डकप आहे. त्यामुळं या दोघांनाही आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मोठा कालावधी मिळाला आहे. त्याचा फायदा घेत रोहितनं बरंच वजन कमी केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या फिटनेसचं कनेक्शन हे २०११ च्या वनडे वर्ल्डकपशी असल्याचा दावा माजी खेळाडू संजय बांगर यांनी केला.

Rohit Sharma
Japan Open squash | जोशना चिनप्पाला कारकिर्दीतील 11 वे पीएसए विजेतेपद

संजय बांगर यांनी रोहित शर्माच्या फिटनेस ट्रान्फॉर्मेशनची तुलना त्याच्या माईंडसेट चेंजशी केली. २०११ चा वर्ल्डकप खेळू न शकलेल्या रोहितनं त्यानंतर आपल्या माईट सेटमध्ये मोठा बदल केला होता. त्यानं खूप कष्ट करून पुन्हा टीममधील आपली जागा पटकावली होती.

३८ वर्षाचा रोहीत या महिन्याच्या सुरूवातीला एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात दिसला होता. त्यावेळी त्यानं खूप वजन घटवलं असल्याचं दिसलं. तो स्लीम दिसत होता. आता १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याची तयारी म्हणून रोहितनं जोरदार फिटनेस केला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दौराच रोहित आणि विराट पुढं भारतीय वनडे संघात राहणार की जाणार हे ठवणारा आहे.

Rohit Sharma
Womens World Cup 2025 | द. आफ्रिकेचा बांगला देशवर 3 गडी राखून विजय

संजय बांगर यांचा मोठा दावा

संजय बांगर यांनी दावा केला आहे की, 'ज्यावेळी रोहित २०११ च्या वर्ल्डकप टीममधून बाहेर गेला होता त्यानंतर त्यानं इतकं स्ट्रीक्ट फिटनेस रूटीन फॉलो केलं होतं. संघातून ड्रॉप होण हा त्यासाठी मोठा धक्का होता. आता देखील अशीच परिस्थिती आहे. त्यानं २०१२ ते २०२४ दरम्यान खूप काही मिळवलं, आता त्याच्यावर फिटनेसवरून टीका होत आहे. ही टीका त्यानं मनावर घेतली आहे. त्यानं आपला फिटनेस सुधारण्यास प्राधान्य दिलं आहे. ही गोष्ट त्याचा माईंडसेट ठरवते.

बांगर पुढे म्हणाला, 'रोहित शर्मा पुन्हा कामगिरीसाठी भूकेला आणि फीट दिसत आहे. कर्णधार असताना तुम्हाला कधीतरी बाऊंड्रीवर फिल्डिंग करावी लागत होती. आता तो कर्णधार नाही त्यामुळं त्याला कुठंही फिल्डिंग करावी लागणार आहे. त्यासाठी रोहित आता स्वतःला यासाठी सज्ज करत आहे. हा एक चांगला संकेत आहे.'

Rohit Sharma
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

तब्बल १० किलो वजन केलं कमी

रोहित शर्माचा जवळचा मित्र अभिषेक नायरनं सांगितलं, 'गेल्या महिन्याभरात रोहित शर्मानं जवळपास १० किलो वजन कमी केलं आहे. नायरच्या देखरेखीखाली रोहितनं जीम आणि नेट सेशन केले आहेत. त्याच्या फिटनेस ट्रेनिंग आणि नेटमधील बॅटिंगचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news