

Rohit Sharma Set For Monumental Milestone
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' अशी ओळख असणारा हा खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये २०,००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ४१ धावांनी कमी आहे. आज रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
रोहितने आतापर्यंत ५०३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १९,९५९ धावा आहेत. त्याची सरासरी ४२.४६ इतकी आहे.डावाच्या सुरुवातीला केलेली त्याची आक्रमक फलंदाजी गेल्या दशकभरात भारताच्या यशामध्ये, विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये, केंद्रस्थानी राहिली आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला होता, ज्यामुळे तो हा नवीन टप्पा फार लवकर गाठणार हे निश्चित झाले आहे.
२०,००० धावांचा टप्पा गाठल्यानंतर रोहित शर्मा हा विक्रम करणारा इतिहासातील चौथा भारतीय फलंदाज ठरेल. आतापर्यंत केवळ तीनच भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात धावा करण्याचा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये : ३४,३५७ धावांसह सचिन तेंडुलकर यादीतील निर्विवाद अग्रगण्य खेळाडू. तर विराट कोहली हा सर्वात जलद २० हजार धांचा टप्पा गाठणारा फलंदाज आहे. सध्या त्याच्या नावावर २७,८०८ धावा आहेत. यानंतर राहील द्रविड यांचा क्रमांक आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल २४,०६४ धावा केल्या होत्या. आता या यादीत आजच सहभागी होण्याची संधी रोहित शर्माला असणार आहे.