Rishabh Pant Injury | ऋषभ पंतला गंभीर दुखापत, अ‍ॅम्ब्युलन्समधून नेलं, आता BCCI ने त्याच्या दुखापतीबाबत दिली अपडेट

IND vs ENG 4th Test | मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली
Rishabh Pant Injury
Rishabh Pant Injury (source- BCCI - ICC)
Published on
Updated on

IND vs ENG 4th Test Rishabh Pant Injury

इंग्लंडविरुद्ध चौथ्या मँचेस्टर कसोटीच्या बुधवारी पहिल्या दिवशी भारताने दिवसअखेर ४ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंत याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. दरम्यान, बीसीसीआयने पंतच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. पंतच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला स्टेडियममधून स्कॅनसाठी नेण्यात आले. सध्या त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे BCCI ने म्हटले आहे.

वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करताना चेंडू चुकला आणि तो थेट पंतच्या उजव्या पायावर आदळला. यामुळे त्याला ‘रिटायर हर्ट’ व्हावे लागले. फिजिओथेरपिस्ट योगेश परमार तातडीने उपचारासाठी धावले. पण तीव्र वेदनांमुळे पंतला उभे राहण्यास त्रास जाणवला. त्यानंतर एक मिनी-अ‍ॅम्ब्युलन्स कार्ट बोलावून पंतला मैदानाबाहेर नेण्यात आले.

Rishabh Pant Injury
IND vs ENG 4th Test Day 1 : भारत पहिल्या दिवसअखेर 4 बाद 264

मँचेस्टर कसोटीत ४८ चेंडूत ३७ धावा काढून खेळत असताना ऋषभ पंतला दुखापत झाली. त्याच्या उजव्या पायाच्या करंगळीजवळ एक जखम झाली असून त्यातून रक्तस्त्राव झाला. त्या ठिकाणी हळूहळू सूज वाढत गेली. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने ४ बाद २६४ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर (१९) आणि रवींद्र जडेजा (१९) नाबाद खेळत आहेत.

Rishabh Pant Injury
Ind vs Eng test | कुलदीपची उणीव भासेल?

पंतच्या दुखापतीबाबत साई सुदर्शननं काय म्हटलंय?

कसोटीत पदार्पण केलेल्या साई सुदर्शनने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, "त्याला (ऋषभ पंत) तीव्र वेदना होत होत्या. त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले."

त्याने खूप चांगली फलंदाजी केली. जर त्याला पुन्हा खेळता आले नाही तर टीमला त्याची कमतरता जाणवेल. पण जे फलंदाज आता फलंदाजी करत आहेत ते सर्वोत्तम खेळी करण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून आम्ही त्याचा चांगल्या प्रकारे सामना करू शकू, असे सुदर्शन पुढे म्हणाला.

'पंत सामन्यात खेळेल की नाही'

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज लियम डायसन यानेदेखील पंतला झालेली दुखापत गंभीर असल्याचे म्हटले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्याने सांगितले की, ऋषभ पंत एक चांगला खेळाडू आहे. त्याला झालेली दुखापत किरकोळ वाटत नाही, मला आशा आहे की तो बरा होईल. पण, मला वाटत नाही की तो या सामन्यात त्याचा अधिक सहभाग राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news