Rashid Khan Crime News | राशीद खान हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गयासुद्दीन वारसी पोलिसांच्या जाळ्यात; कोर्टात शरण येताच अटक!

Rashid Khan Crime News | एक वर्ष पोलिसांना हुलकावणी ; न्यायालयात शरण येताच क्राईम ब्रांचच्या स्वाधीन
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी फाटा येथील कॅफेमध्ये राशीद खान या युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेला गयासुद्दीन रजाउल्ला वारसी (२४) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तब्बल एक वर्ष पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या वारसीने अखेर न्यायालयात हजेरी लावत शरणागती पत्कारली. न्यायालयात हजर होताच इंदिरानगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत क्राईम ब्रांच युनिट-१ च्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.

Arrested
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

२६ सप्टेंबरला पाथर्डी फाटा येथील कॅफेमध्ये राशीद खान याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अंबड आणि इंदिरानगर पोलिसांनी संशयितांचा माग काढत हाशिम रजाउल्ला वारसी, रवीनाथ उर्फ दुर्लभ निरहू यादव, साजिद रजाउल्ला वारसी आणि अरशद हिकमतहुसेन शेख यांना ताब्यात घेतले होते.

त्यांच्या ताब्यातून पिस्तूल, काडतुसे, सुरा आदी हत्यारे जप्त करण्यात आली होती. खून केल्यानंतर संशयित कॅफेबाहेर पडताना तलवारी दाखवत दहशत निर्माण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामुळे अंबड परिसरात सक्रिय असलेल्या वारसी टोळीच्या कारवायांकडे पोलिसांचे विशेष लक्ष केंद्रित झाले.

Arrested
Kalika Mata Yatra | नाशिक कालिकामाता नवरात्र उत्सव: रहाटपाळण्याच्या जागेचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात!

या कारवाईनंतर गयासुद्दीन वारसी मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता. क्राईम ब्रांच युनिट-१, युनिट-२, गुंडा विरोधी पथक तसेच इंदिरानगर पोलिसांनी त्याचा सातत्याने शोध घेतला. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी तो नाशिकसह गुजरातमध्ये ठिकाणे बदलत असल्याची माहिती तपासात समोर आली.

विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवरील वेगवेगळ्या आयडींच्या माध्यमातून तो कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वर्षभर पोलिसांचा ससेमिरा सुरू असताना अखेर त्याला न्यायालयात हजर होणे भाग पडले. या कारवाईमुळे वारसी टोळीला मोठा धक्का बसला असून, अंबड परिसरातील तिच्या गुन्हेगारी कारवायांचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news