PV Sindhu Paris Olympics 2024 |पी.व्ही. सिंधूची दिमाखात प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

इस्टोनियाच्या क्रिस्टिनचा सलग दाेन गेममध्‍ये केला पराभव
PV Sindhu Paris Olympics 2024
पी. व्ही. सिंधू X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेली एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुसरा गट सामना जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेली आहे. सिंधूने रविवारी महिला एकेरीच्या गट-एम मधील पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा सहज पराभव केला होता. सिंधूचा आज दुसरा सामना इस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबासोबत झाला. हा सामना तिने 21-5, 21-10 असा सरळ दाेन गेममध्‍ये जिंकत दिमाखात बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उपउपांत्यपूर्व फेरी ) धडक मारली आहे.

सिंधूने सामना एकतर्फी जिंकला

पहिल्‍या गेममध्‍ये सिंधूने एस्टोनियाच्या कुबाला एकही संधी दिली नाही. एकतर्फी खेळात तिने पहिला गेम २१-५ असा आपल्‍या नावावर केला. यानंतर दुसर्‍या गेममध्‍ये कुबाने कमबॅकचा प्रयत्‍न केला;पण अनुभवी सिंधूने आपला नैसर्गिक खेळाने वर्चस्‍व कायम ठेवत दुसरा गेम 21-10 असा जिंकला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला ज्या खेळाडूंकडून पदकाच्या सर्वाधिक आशा आहेत, अशा खेळाडूंमध्ये बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूचे नावही सामील आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन सामने २७ जुलैपासून सुरू झाले आहेत. सिंधूने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरा सामना जिंकला.

PV Sindhu Paris Olympics 2024
Paris Olympics Hockey : हरमनप्रीत सिंगच्या गोलचा ‘चौकार’! भारताचा आयर्लंडवर 2-0 ने विजय

२९ मिनिटांत मालदीवच्या खेळाडूचा पराभव

भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रविवारी विजयी सलामी दिली होती. तिने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमाथ नाबाचा २९ मिनिटात फडशा पाडला. पहिला सेट १३ मिनिटांत २९-९ असा जिंकून, दुसरा गेम तिने १४ मिनिटांत २१-६ असा खिशात टाकून सामना संपविला होता.

सिंधू रचणार इतिहास

पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोडियम गाठण्यात ती यशस्वी ठरली तर पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरेल. २९ वर्षीय सिंधू गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही, परंतु तिने सलग तिसरे पदक जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. पॅरिसला येण्यापूर्वी सिंधूने जर्मनीतील सारब्रुकेन येथील स्पोर्टकॅम्पस सार येथे प्रशिक्षण घेतले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news