India Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझाकडे मोठी जबाबदारी! रमेश पोवारचीही निवड समितीत एन्ट्री

India Chief Selector: माजी क्रिकेटपटू रमेश पोवार यांचाही निवड समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
India Chief Selector
India Chief SelectorPudhari
Published on: 
Updated on: 

India Chief Selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत मोठा बदल केला आहे. माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अजित आगरकर यांची जागा घेणार आहेत. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू रमेश पोवार यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आला आहे.

प्रज्ञान ओझा यांची नियुक्ती त्यांच्या कसोटी क्रिकेटमधील अनुभवाच्या आधारे करण्यात आली आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठतेचा निकष महत्त्वाचा ठरला. त्यामुळे आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवडीची महत्त्वाची जबाबदारी प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे असेल.

रमेश पोवार यांची निवड समितीत वर्णी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीतील अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांनी निवड समितीच्या सदस्यपदासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. बीसीसीआयच्या मुख्यालयात इच्छुक उमेदवारांची छाननी आणि मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर दोघांनी रमेश पोवार यांच्या नावाची एकमताने शिफारस केली.

रमेश पोवार यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताकडून दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच मुंबई आणि गुजरातच्या संघांनाही प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आशिया कपचे विजेतेपद मिळवले. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्यपदक जिंकले होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता पुरुष क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेत होण्याची अपेक्षा आहे.

India Chief Selector
Asian Para Games : भारताचे पदकांचे खाते उघडले! १० मीटर रायफल प्रकारात मोनाचा सुवर्णवेध, अवनीची रौप्य कामगिरी

अजित आगरकर यांच्या कामगिरीचे कौतुक

अजित आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक महत्त्वाची विजेतेपदे मिळवली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया कप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीचे बीसीसीआयने कौतुक केले आहे.

आता नव्या निवड समितीसमोर भारतीय संघासाठी योग्य खेळाडूंची निवड करण्याचे आव्हान असेल. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा, खेळाडूंची कामगिरी आणि संघातील संतुलन लक्षात घेऊन निवड समितीला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

India Chief Selector
Pakistan Cricket : इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत PCB ला झोंबली; इंग्लंडचे २ दिग्गज खेळाडू कमेंट्री पॅनेलमधून 'आऊट'!

भारतीय पुरुष संघाची नवी निवड समिती

  • प्रज्ञान ओझा — अध्यक्ष

  • शिवसुंदर दास — सदस्य

  • आर. पी. सिंह — सदस्य

  • अजय रात्रा — सदस्य

  • रमेश पोवार — सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news