Praggnanandhaa: प्रज्ञानंदची ऐतिहासिक गरुडभरारी! 'ग्रँड चेस टूर' जिंकणारा ठरला पहिला भारतीय

Praggnanandhaa Grand Chess Tour: भारताचा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद रमेशबाबू 'ग्रँड चेस टूर' जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
R Praggnanandhaa
R Praggnanandhaafile photo
Published on
Updated on

Praggnanandhaa Grand Chess Tour

सेंट लुईस: भारताचा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद रमेशबाबू 'ग्रँड चेस टूर' जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गुरुवारी सेंट लुईस येथे झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात प्रज्ञानंदने गतविजेता फॅबियानो कारुआना याच्याविरुद्ध शानदार पुनरागमन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रज्ञानंद कारुआनापेक्षा सहा गुणांनी मागे होता. मात्र, त्याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत दोन्ही रॅपिड सामने जिंकले आणि आघाडी मिळवली. त्यानंतर ब्लिट्झ फेरीत गुणसंख्या बरोबरीत राखत त्याने १५-१३ अशा अंतिम फरकाने विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या ब्लिट्झ सामन्यात वेळेच्या दडपणाखाली प्रज्ञानंदकडून एक चूक झाली होती, परंतु कारुआनाला त्याचा फायदा घेता आला नाही आणि अखेरीस सामना बरोबरीत सुटला.

R Praggnanandhaa
Vaibhav Sooryavanshi U19 Selection: वरिष्ठ संघात खेळतोय तरी वैभव सूर्यवंशीची १९ वर्षाखालील संघात का झाली नाही निवड?

दुसऱ्या बाजूला, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात ग्रँडमास्टर वेस्ली सो यानेही व्हिन्सेंट कीमरविरुद्ध दमदार पुनरागमन केले. रॅपिड फेरीत दोघांनी एकमेकांवर मात केली असली, तरी वेस्ली सो याने ब्लिट्झ प्रकारातील चारही सामने जिंकून १८-१२ अशा फरकाने तिसरे स्थान पटकावले.

याआधी, बुधवारी झालेल्या दुसऱ्या 'क्लासिकल' गेममध्ये प्रज्ञानंदने बरोबरी साधली होती, परंतु त्याचा प्रतिस्पर्धी कारुआना सहा गुणांनी आघाडीवर होता. त्याला कारुआनाविरुद्धचा पहिला 'क्लासिकल' सामना ६-० असा गमवावा लागला होता, मात्र दुसऱ्या 'क्लासिकल' सामन्यात त्याने ३-३ अशी बरोबरी साधली होती.

R Praggnanandhaa
Hockey World Cup 2026 : ऐतिहासिक कामगिरी! भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य जर्मनीला धूळ चारत पटकावले पाचवे स्थान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news