Hockey World Cup 2026 : ऐतिहासिक कामगिरी! भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य जर्मनीला धूळ चारत पटकावले पाचवे स्थान

१९७४ मधील पदार्पणाच्या विश्वचषकानंतरची स्पर्धेतील ठरली सर्वोत्तम कामगिरी
Indian women hockey team World Cup 2026
उत्तरार्धात दाखवलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आज (दि. २७) जर्मनीचा ३-१ असा पराभव केला.X
Published on
Updated on

Indian women hockey team World Cup 2026

उत्तरार्धात दाखवलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आज (दि. २७) जर्मनीचा ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने २०२६ च्या महिला हॉकी विश्वचषकात पाचवे स्थान निश्चित केले. १९७४ मधील पदार्पणाच्या विश्वचषकात मिळवलेल्या चौथ्या स्थानानंतरची ही भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

जर्मनीचे वर्चस्व, भारताचा बचाव अभेद्य

सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावधगिरीने खेळ केला. कर्णधार सलिमा टेटेने आक्रमक चाली रचल्या, परंतु जर्मनीने हळूहळू सामन्यावर पकड मिळवत भारतीय बचावावर दबाव वाढवला. जर्मनीला पेनल्टी कॉर्नरही मिळाला, मात्र गोलरक्षक बिचू देवीने उत्कृष्ट बचाव करत जर्मनीची संधी उधळली.दुसऱ्या सत्रातही जर्मनीचेच वर्चस्व पाहायला मिळाले. १८ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर भारतीय खेळाडूंनी हाणून पाडला. यानंतर मध्यंतरापूर्वी सलिमा टेटे आणि नवनीत कौर यांनी गोल करण्याचे सुरेख प्रयत्न केले, पण जर्मनीच्या गोलरक्षकाने बचाव करत मध्यंतरापर्यंत गोलशून्यता कायम ठेवली.

Indian women hockey team World Cup 2026
Indian Hockey Team New Jersey : जर्सीचा रंग 'भगवा' करण्यामागे हॉकी इंडियाचे स्पष्टीकरण; सांगितले तांत्रिक कारण

इशिका आणि नवनीतची चमकदार कामगिरी

उत्तरार्धात भारतीय संघ जिंकण्‍याच्‍या निर्धारानेच मैदानात उतरला. ३८ व्या मिनिटाला ज्योती दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेल्याने भारताला मोठा धक्का बसला. मात्र, खचून न जाता अवघ्या पाच मिनिटांतच (४३ वे मिनिट) इशिका चौधरीने वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर विलोभनीय गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.या धक्क्यातून जर्मनी सावरण्यापूर्वीच, ४४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नवनीत कौरने चेंडूला जाळीची वाट दाखवत भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली. अवघ्या दोन मिनिटांत सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.

Indian women hockey team World Cup 2026
Indian Women Hockey | भारतीय महिलांची विजयी सलामी

अंतिम सत्रात विजयावर शिक्कामोर्तब

अंतिम सत्राच्या सुरुवातीलाच (४७ वे मिनिट) नवनीत कौरने गोलरक्षकाला चकवत अत्यंत संयमीपणे दुसरा वैयक्तिक गोल नोंदवला आणि भारताला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.सामन्याच्या ५९ व्या मिनिटाला जर्मनीच्या लिन क्रिंग्सने गोल करत पिछाडी ३-१ अशी कमी केली. शेवटच्या काही सेकंदात जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र भारतीय बचावाने धोका टाळत ३-१ अशा ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news