Paris Olympics Shooting | कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कमाल! ५० मीटर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये धडक

Paris Olympics Shooting | अंतिम फेरीसाठी ठरला पात्र
Swapnil Kusale
भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने एकूण ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवले आहे Facebook
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटच्या पुरुषांच्या पात्रता फेरीत (50 m Rifle 3P Men's Qualification) भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने एकूण ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवले आहे आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तर ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर एकूण ५८९ गुणांसह ११व्या स्थानावर राहिला. या फेरीतील टॉप ८ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे.

स्वप्नील कुसाळे हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्याने पुण्यातील बालेवाडीतील क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचा सराव केला आहे.

Swapnil Kusale
Paris Olympics 2024 | बॅडमिंटनमधील पदकाचे 'लक्ष्‍य'...! लक्ष्य सेनची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज आहे. स्वप्निलने यापूर्वी अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिंपिकवेळी पात्रता फेरीतील त्याची संधी अगदी काठावर हुकली होती. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीत मात्र चमकदार कामगिरी करून त्यांने आपला सहभाग निश्चित केला होता. भारतीय रेल्वेत टीसी असणारा स्वप्निल बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये नियमित सराव करतो. पॅरिस ऑलिंपिकला रवाना होण्यापूर्वी काही दिवस तो दिल्लीत शूटिंग रेंजमध्ये सराव करत होता.

पी. व्ही. सिंधू प्री-क्वार्टर फायनलमध्ये

ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेली एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुसरा गट सामना जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेली आहे. सिंधूने रविवारी महिला एकेरीच्या गट-एम मधील पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा सहज पराभव केला होता. सिंधूचा आज बुधवारी दुसरा सामना इस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबासोबत झाला. हा सामना तिने २१-५, २१-१० असा सरळ दाेन गेममध्‍ये जिंकत दिमाखात बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उपउपांत्यपूर्व फेरी ) धडक मारली.

बलराज पनवार सहाव्या स्थानी

"भारतीय रोइंगचा एमएस धोनी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या २५ वर्षीय बलराज पनवार याला पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष एकल स्कल्स रोइंगच्या (2024 Olympics Rowing Balraj Panwar) सेमीफायनल सी/डीमध्ये ७:०४:९७ वेळेसह सहाव्या स्थान मिळाले. या कामगिरीसह तो अंतिम 'डी'साठी पात्र ठरला, जिथे तो १९-२४ स्थानांसाठी स्पर्धा करेल.

Swapnil Kusale
PV Sindhu Paris Olympics 2024 |पी.व्ही. सिंधूची दिमाखात प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news